Rakhi Sawant: हिचे पॉर्न व्हिडिओ माझ्याकडे.. राखी सावंतकडून शर्लिनची पोलखोल; गुन्हा दाखल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant files a defamation case against Sherlyn Chopra after her remarks; says I have her porn videos in my phone

Rakhi Sawant: हिचे पॉर्न व्हिडिओ माझ्याकडे.. राखी सावंतकडून शर्लिनची पोलखोल; गुन्हा दाखल!

जेव्हा पासून साजिद खान बिग बॉस १६ घरात गेला आहे तेव्हापासून शर्लिन चोप्राचे रक्त खवळले आहे आणि तिने साजिद विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि साजिदवर ती अनेक आरोप करत आहे. 'MeToo' चे म्हणजे महिलांचे सोशन करणारे आरोपी या शोमध्ये नसावेत, अशी तिची मागणी आहे. तर साजिद खानच्या समर्थनार्थ राखी सावंत मैदानात उतरली आहे. एकीकडे साजिद बिग बॉसच्या घरात असताना इथे बाहेर मात्र या दोघी बेसुमार भांडत आहेत. आता तर राखीने शर्लिन चोप्रा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

(Rakhi Sawant files a defamation case against Sherlyn Chopra after her remarks; says I have her porn videos in my phone)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: 'कॉमन मॅन'ची एक्झिट; त्रिशूल मराठे घराबाहेर..

गेले काही दिवस साजिद खानवरुन राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात शाब्दिक वाद जोरदार सुरू होते. दोघेही एकमेकांवर वैयक्तिक कमेंट करत आहे. एकीकडे शर्लिनने राखीची नक्कल केली,तिची खिल्ली उडवली. तर राखीने शर्लिनबद्दल 'वरपासून खालपर्यंत शस्त्रक्रिया' अशी कमेंट करत तिची पोळखोल केली. ही शब्द युद्ध सोशल मीडियावर रंगल्यानंतर आता राखी सावंतने शर्लिन चोप्रावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. शिवाय राखीने शर्लिनवर काही गंभीर आरोप करत गुन्हा देखील दाखल केला आहे.

हेही वाचा: Prashant Damale: प्रशांत दामलेंना पद्म पुरस्कार? देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले..

पापाराझीशी बोलताना राखी म्हणाली, 'शर्लिनने इतक्या वर्षात काहीच केले नाही, ती झोपली होती का? आता साजिद खान बिग बॉसच्या घरात असल्याने त्याच्या नावाचा वापर करून ही प्रसिद्धी मिळवत आहे. हे चुकीचे आहे. बॉलीवूडमधून कोणी बोलायला येत नाही, सगळे घाबरतात. मी कोणाला घाबरत नाही. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या हृदयात भारतातील लोकांसाठी प्रेम आहे आणि म्हणूनच मी त्याच्यासाठी लढण्यासाठी आलो आहे. राखीने शर्लिनवर आरोपही केला की, शर्लिनने इंडस्ट्रीतील काही लोकांना पैशासाठी ब्लॅकमेलही केले आहे. पण तिची अश्लील चित्रफीत (पॉर्न व्हिडिओ ) माझ्या ताब्यात आहे.' त्यामुळे हा वाद आता चांगलाच टोकाला गेला आहे.