Rakhi Sawant: गुलाबी अस्वल पाहिलात का? राखी सावंत झाली ट्रोल.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant get trolled for her pink fur gown at filmfare dubai

Rakhi Sawant: गुलाबी अस्वल पाहिलात का? राखी सावंत झाली ट्रोल..

rakhi sawant: राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मग तो मुद्दा तिच्या बॉयफ्रेंडचा असो किंवा सोशल मिडीयावरच्या विचित्र व्हिडीओ असो, ती नेहमीच धुमाकूळ घालत असते. सध्या राखी सावंत दुबईमध्ये फिल्मफेअरच्या कार्यक्रमामध्ये गेली आहे. अनेक कलाकारांनी देखील तिथे हजेरी लावली आहे. पण राखीने या सोहळ्यात असा विचित्र ड्रेस आणि मेकअप केला आहे की ती तिच्या ड्रेसमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.

(Rakhi Sawant get trolled for her pink fur gown at filmfare dubai)

हेही वाचा: Akshaya Naik: मालिका सोडली तरी प्रेम कायम.. अभ्याच्या वाढदिवशी लतिकाची खास पोस्ट..

दुबईमध्ये फिल्मफेअर सोहळ्यात रणवीर सिंग पासून ते गोविंदा, आयुष्यामान खुराणा, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर नव्हे तर संपूर्ण बॉलीवुडनेच हजेरी लावली आहे. पण या कार्यक्रमात विशेष निदर्शनास आली ती राखी सावंत. त्याची दोन कारणं होती, एक म्हणजे या सोहळ्याला राखी एकटी नाही तर तिच्यासोबत तिचा नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी देखील सोबत आहे. आणि दुसरे कारण म्हणजे तिचे कपडे. या सोहळ्यासाठी राखीने गुलाबी रंगाचा फर गाऊन घातला होता आणि त्यावर भडक गुलाबी रंगाची लिपस्टीक लावली होती. तिचा हा अवतार भलताच विनोदी वाटत असून नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

तिच्या या लुकमधील काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. तिच्या या लुकवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. फक्त त्या भन्नाट कमेंटस् वाचून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही.

एकाने लिहिले आहे की," राखी आज तु तर गुलाबी अस्वल दिसत आहे" तर एकाने तिला "अय्या गुलाबी गोरिला" अशी कमेंट केले. तर काहींना तिचा हा गुलाबी मेकअप आणि ड्रेस नाही आवडला. " गुलाबी भूत दिसत आहे", "नाही ही तर गुलाबी डायन दिसत आहे" अशा अनेक कमेंट तिला मिळाल्या आहेत. तर काहींनी तिच्या नवीन बॉयफ्रेंडला ट्रोल केले आहे, राखी बरोबर राहून आदिला फुकटचा भाव भेटत आहे. अशाही काही कमेंट आल्या आहेत.

टॅग्स :Rakhi Sawant