Rakhi Sawant Video: राखी सांवत आता तिसऱ्या लग्नाच्या तयारी? व्हिडिओ व्हायरल..

Rakhi Sawant Video
Rakhi Sawant VideoEsakal

Rakhi Sawant Video News: राखी सावंत हे चर्चेतलं नाव आहे. ती नेहमी असं काहीतरी करते ज्याची चर्चा गावभर होते. गेल्या काही दिवसांपुर्वी ती तिचा दुसरा पती आदिल खान दुर्रानीमुळे चर्चेत होती. तिने आदिलसोबत गुपचूप दुसरे लग्न केले. त्यानंतर तिच्यात आणि आदिलमध्ये काहीतरी बिनसलं आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाले. राखीने याबद्दल मिडियासमोर बरेच काही सांगतिले.

आदिलने तिला फसवलं इतकच नाही तर त्याने तिला मारहाण केली. तिचा गर्भपात झाला आणि त्याने तिचे पैसेही घतले जे परत केली नाही. याबद्दल तिचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलही झाले होते. आता आदिल तुरुगांत आहे आणि राखी सांवत तिच्या कामात व्यस्त आहे.

Rakhi Sawant Video
Ponniyin Selvan 2: ऐश्वर्याच्या 'पोनियिन सेल्वन'समोर सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' चित्रपट सोडणार जीव?

दरम्यान राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती तिचा खास मित्र मोहम्मद दानिशच्या लग्नाला गेली होती. तिथून त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. वास्तविक राखी सावंत पिवळ्या लेहेंगा-चोलीमध्ये नववधूसारखी दिसत होती.

मोहम्मद दानिशच्या लग्नाला ती पोहोचली होती. यावेळी पापाराझींनाही तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. यावेळी कधी ती नाचताना तर कधी ढोलकी वाजवताना दिसली. या व्हिडियोत राखी सांवत तिचा ड्रामा करतांना दिसली.

Rakhi Sawant Video
Ponniyin Selvan 2 Twitter Review: 'बाहुबली पेक्षाही जबरदस्त..', 'पोन्नियिन सेल्वन'2 पब्लिकच्या मनाला भिडला! काय म्हणताय ट्विटर रिव्हू

ती जेव्हा मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचली तेव्हा राखीला पापाराझींनी तिला घेरले आणि आदिल खानबद्दल विचारायला सुरुवात केली.

यावर राखी म्हणाली, 'आदिलने मला खूप वचन दिले होते की एक दिवस तो माझ्याशी असेच लग्न करेल. पण आता तो त्याच्या सासरी आहे. आदिलची प्रत्येक गोष्ट खोटं बोलत असे. सर्व आश्वासने खोटी ठरली. म्हणूनच प्रत्येक लग्नात मी वधू म्हणून येते. मी कुठेही लग्नासाठी जाते, मी अशी नवरी म्हणून जाते. काय सांगता येत चांगला नवरदेव मिळेल. मात्र त्यानंतर तिने सांगतिले की ती कदाचित पुन्हा लग्न करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com