Rakhi Sawant Video: ए राखी आता बस्स कर तुझी नाटकं! नेटकरी संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant Video

Rakhi Sawant Video: ए राखी आता बस्स कर तुझी नाटकं! नेटकरी संतापले

ड्रामा क्वीन म्हणून ओळख असलेली राखी सावंत ही सध्या तिच्या वैयक्तिक आयूष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच तिच्या आईचे निधन झाले. तिची आई ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त होती.

राखी आईच्या निधनानंतर संपूर्णपणे कोसळली आहे. ख्रिश्चन धर्माच्या रितीरिवाजानुसार राखीच्या आईवर अंतिमसंस्कार करण्यात आले.आईला निरोप देताना राखी सतत रडत होती. त्यावेळीचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर फिरत होते. या व्हिडिओमध्ये राखी बऱ्याचदा तिच्या आईबद्दल बोलतांना दिसली.

त्यानंतर आता राखीने पुन्हा तिच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट केला आहे. या व्हिडिओत ती जोरजोरत रडतांना दिसते आहे. त्या व्हिडिओच्या बॅकग्राउडलाही एक सुफी गाणं वाजतांना दिसतय आणि राखी या व्हिडिओत इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग करतांना दिसतेय.

हा व्हिडिओ पहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राखीचा क्लास घेतला आहे. काहींना राखीचा हा व्हिडिओ मूळीच आवडलेला नाही. काहींच म्हणण आहे की मान्या आहे की तुझ्या आईचं निधन झालं आहे. मात्र असं रडतांना व्हिडिओ कोण पोस्ट करतय. काही जणांनी राखींच्या या व्हिडिओमुळे तिला ट्रोल केलयं तर काहींनी तिचं सांत्वनही केलं आहे.

तिची आई गेल्यानंतरही तिच्या वागणुकीमुळे लोकांनी तिच्यावर टीका केली होती. आई गेल्या नंतरही तीचा ड्रामा सुरूच असल्याने नेटकऱ्यांनी तिला अक्षरशः कमेंट मध्ये शिव्या दिल्या होत्या. आई गेली तरी तुझी नौटंकी थांबेना, अशा शब्दात तिला सुनावलं मात्र तरीही ती काही ऐकायला तयारच नसल्याचं दिसतयं.

टॅग्स :viralRakhi SawantVideo