esakal | राखीपुढं कंगणाची डाळ कशी शिजेल?, परखड शब्दांत तोंड केलं बंद

बोलून बातमी शोधा

Rakhi sawant slams kangana ranaut
राखीपुढं कंगणाची डाळ कशी शिजेल? परखड शब्दांत तोंड केलं बंद
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बिग बॉस शोमुळे चर्चेत आलेली कोन्ट्रवर्सि क्विन राखी सावंत नेहमीच बोल्ड वक्तव्य करत असते. कोन्ट्रवर्सि आणि बोल्ड वक्तव्य देणाऱ्या राखीला टक्कर देणारी बॉलिवूडची अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. या दोघी नेहमी सोशल मीडियावर राजकारणाबद्दल किंव देशात सुरू असलेल्या घड्यामोडींबद्दल भाष्य करत असतात. कंगना सरकारबद्दलचे तिचे मत सोशल मीडियावर मांडत असते. त्याबद्दल राखीला प्रश्न विचारल्यावर तिने जे उत्तर दिले त्यावरून आता सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.

काही दिवसांपूर्वी राखी पीपीई किट घालून रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी देखील राखीने लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करणयाचा संदेश दिला. राखीच्या सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये ती कधी भाजी घेण्यासाठी तर कधी कॉफी पिण्यासाठी घराबाहेर पडताना दिसते. त्यामुळे बऱ्याचवेळा नेटकरी तिला ट्रोल करतात.

राखी नुकतीच घराबाहेर सामान घ्यायला बाहेर पडली. तेव्हा तिला चाहत्यांनी घेरले. त्यांनी राखीला एका प्रश्न विचारला , ‘कंगना सतत असे म्हणत आहेत की, आजकाल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. या बद्दल तुझे काय मत आहे?’ त्यावर राखीने उत्तर दिले ‘कंगना, कृपया देशाची सेवा कर. आपल्याकडे इतके कोट्यावधी रुपये आहेत. त्यातून ऑक्सिजन खरेदी कर आणि लोकांमध्ये वितरित कर, आम्ही तर हेच करत आहोत.’ राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वेळी राखीने दुहेरी मास्क घातला होता तसेच तिने नागरिकांना दुहेरी मास्क घालण्यास, हात धुण्यास आणि सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले. राखीच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. पण एका नेटकऱ्याने या व्हिडीओला कमेंट केली, ‘तु का स्वत: विनाकारण घराबाहेर पडत आहेस’