esakal | व्हॅक्सिन देतायं, एक गाणं म्हणू का? डॉक्टरही चक्रावले
sakal

बोलून बातमी शोधा

rakhi sawant

व्हॅक्सिन देतायं, एक गाणं म्हणू का? डॉक्टरही चक्रावले...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची ड्रामा क्वीन (bollywood drama queen) म्हणून प्रसिध्द असणारी राखी सावंत नेहमी चर्चेचा विषय असते. लोकांनाही ती ड्रामा क्वीन आहे हे माहिती असूनही ते तिच्या वेगवेगळ्या व्हिडिओला लाईक करताना दिसतात. बिग बॉसच्या सीझनमध्ये (big boss season) राखीनं केलेली कमाल सर्वांना माहिती आहे. तिच्यामुळे त्या शो ची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढली होती. काही दिवसांपूर्वी तिनं रामदेव बाबांवर (ramdev baba) केलेली कमेंट ट्रेडिंगचा विषय होती. आता राखी चर्चेत आली आहे त्याचे कारण म्हणजे तिनं व्हॅक्सिन घेताना केलेली गंमत. यामुळे व्हॅक्सिन देणा-या डॉक्टर्सलाही हसु आवरलेले नाही. (rakhi sawant took first dose corona vaccine started singing fear after seeing injection)

आपल्या विनोदी स्वभावासाठीही राखी (rakhi sawant) ओळखली जाते. त्यासाठी ती प्रसिध्दही आहे. सध्या राखीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिनं व्हॅक्सिन घेताना गाणं गायलं आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे. त्याला राखीच्या चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे. तिचं कौतूकही केलं आहे. काहींनी तिला नेहमीप्रमाणे ट्रोलही केलं आहे. राखी सोशल मीडियावर लोकप्रिय असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा फॅन क्लासही मोठा आहे.

त्या व्हिडिओमध्ये राखी जेव्हा व्हॅक्सिन घ्यायला जाते तेव्हा ती कमालीची घाबरल्याचे दिसते आहे. ती डॉक्टरांना आपल्याला जास्त वेदना न देता व्हॅक्सिन देण्याची विनंती करते. शेवटी ती आपण अशावेळी एखादे गाणे म्हणू का असे डॉक्टरांना विचारते. आणि गाणं गायला सुरुवातही करते. हे पाहून काही काळ डॉक्टरांना हसु आवरत नाही.

हेही वाचा: Aai Kuthe Kay Karte:संजना गेली मुंबईला ! पाहा व्हिडिओ

राखीनं तिच्या सोशल मीडियावरुन हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. राखीचे एक नवे गाणे आता प्रदर्शित होणार आहे. त्या गाण्याचे नाव तेरे ड्रीम में मेरी इंट्री.... असे आहे. राखीनं आता कोरोनाच्या व्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. राखीच्या त्या व्हिडिओला विंदू दारा सिंगनं कमेंट दिली आहे. त्यानं लिहिलं आहे, तुझ्या हातात कोविशिल्डची इंट्री.....

loading image