Rakhi Sawant: 'मला 3 महिने आधीच कॉल आला होता की..',राखी-आदिल केसवर तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा गौप्यस्फोट

आदिल खान दुर्रानी आधी राखी सावंतनं रितेश सिंग सोबत लग्न केलं होतं. त्याच्यासोबतही अभिनेत्रीचं झालेलं भांडण जगजाहिर आहे.
Rakhi Sawant, Adil Khan Durrani, Rakhi sawant ex husband ritesh
Rakhi Sawant, Adil Khan Durrani, Rakhi sawant ex husband ritesh Google

Rakhi Sawant: राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी मध्ये सुरु असलेल्या वादा दरम्यान आता तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशची रिअॅक्शन समोर आली आहे. इन्स्टा लाइव्ह करत रितेशनं सांगितलं आहे की राखीनं यासंदर्भात त्याला फोन करुन ३ महिने आधीच सांगितलं होतं.

रितेश म्हणाला,''राखी त्याच्यासोबत कशीही वागली असेल तरी तो याबाबतीत राखीसोबत आहे. तो म्हणाला की,सत्य काय आहे हे राखीच्या डोळ्यात आपण पाहू शकतो. खरंतर हा त्या मुलींसाठी धडा आहे ज्या लव्ह जिहादच्या चक्रव्यूहात फसतात. राखी आता घाबरलेली आहे..ती खरं काय ते सांगू नाही शकत आहे. या प्रकरणात खूप सारे लोक सामिल आहेत. हा संपूर्णतः एक सांप्रदायिक मुद्दा आहे''.

Rakhi Sawant, Adil Khan Durrani, Rakhi sawant ex husband ritesh
Sidharth Malhotra लग्नात कियारा अडवाणीच्या पाया का पडला? जाणून घ्या यामागचं खास कारण..

राखी सावंतच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा एकदा वादळ आलं आहे. तिचं आणि आदिल मधील भांडण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे. आता या प्रकरणा संदर्भात तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशनं इन्स्टा लाइव्ह करत काही खुलासे केले आहेत.

रितेश म्हणाला की,''सत्य काय आहे ते राखीच्या डोळ्यात पाहिलं जाऊ शकतं. तिनं मला यासंदर्भात सगळं सांगितलं होतं. राखी खोटं बोलत नाही. आदिलनं इतकी घाणेरडी कृत्य राखीसोबत केली आहेत की ते मी इथे सांगूही शकत नाही. राखी स्वतः सांगेल तेच योग्य राहील''.

Rakhi Sawant, Adil Khan Durrani, Rakhi sawant ex husband ritesh
Bhau Kadam घरी आला अन् घरच्या कुत्र्यानं थेट..., व्हायरल व्हिडीओवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव

रितेश म्हणाला,''जेव्हा मन तुटतं तेव्हा काय दुःख होतं हे तुला आता कळत असेल राखी. मी तुझ्या सोबत आहे. मी देखील दोनदा प्रेम केलं आणि दोन्ही वेळेला माझ्या वाट्याला धोकाच आला. राखी मी,तुझा भाऊ आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. हा त्या मुलींसाठी चांगला धडा आहे ज्या लव्ह जिहादच्या चक्रव्यूहात फसतात. मी नेहमीच तुझ्या बाजूने उभा राहीन''.

आदिल खान आधी राखीनं रितेश सोबत लग्न केलं होतं. पण त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. राखीला जेव्हा कळालं की रितेशचं लग्न झालंय, त्याला एक मुलगा आहे तेव्हा ती त्याच्यापासून विभक्त झाली.

राखीचं म्हणणं होतं की की रितेशनं तिच्यापासून त्याचं पहिलं लग्न लपवलं होतं. राखीचं रितेशसोबतही मोठं भांडण झालं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com