हिंदी कलाकारांच्या भेटीवर रामचरणच्या बायकोचा मोदींना 'हा' सवाल 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

बॉलिवूड कलाकरांच्या मोदी भेटीवर दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांची सून आणि सुपरस्टार रामचरणची पत्नीने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

मुंबई : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड कलाकरांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये शाहरुख खान, आमिर खान, एकता कपूर, सोनम कपूर आणि असे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांचा समावेश होता. यावेळी मोदींनी त्यांच्यासोबत गांधी विचांरावर चर्चा केली. पण, बॉलिवूड कलाकरांच्या या भेटीवर दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांची सून आणि सुपरस्टार रामचरणची पत्नीने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. 

उपासना कमीनेनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मोदींनी पत्र लिहिले आहे. फक्त हिंदी कलाकारांनाच निमंत्रण का? असा सवाल तिने यामध्ये केला आहे. यामध्ये तिने लिहिलं आहे, ‘प्रिय नरेंद्र मोदीजी. भारताच्या दक्षिण भागात राहणारे आम्ही लोक तुमचं खुप कौतुक करतो आणि तुमच्यासारखी व्यक्ती पंतप्रधान म्हणून लाभली याचा आम्हाला अभिमान आहे. योग्य आदरासह आम्हाल असं वाटतं की, सांस्कृतिक प्रतिकांचे प्रतिनिधित्त्व केवळ हिंदी सिनेसृष्टी आणि कलाकरांपुरते मर्यदित राहिले असून दाक्षिणात्य भाग आणि इंडस्ट्रिकडे दुलर्क्ष झाले आहे. अशाप्रकारे मी माझ्या भावना दु:खी मनाने व्यक्त करते आहे आणि मला याचा योग्द पद्धतीने विचार केला जाईल अशी आशा करते’ .

उपासनाच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टला रिअक्ट करत उपासनाने आवाज उठविल्याबद्दल तिचं कौतुक करत आहेत. पंतप्रधान मोदींना भेटलेल्या कलाकरांमध्ये आमिर खान, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, कंगणा रणावत, जॅकलीन फर्नांडिज, एकता कपूर, सोनम कपूर, साजिद नाडियावाल, बोनी कपूर, अनुराग बासू, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, इम्तियाज अली यांचा समावेश होता. या भेटीनंतर जवळपास सर्वच कलाकारांनी पंतप्रधान मोदींसमवेत सेल्फी काढून घेतले. ते सेल्फी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Charan s wife Upasana writes to PM Modi about the meeting of Bollywood stars