Ram Gopal Varma Vyuham: राम गोपाल वर्मांच्या आगामी 'व्यूहम' सिनेमावर घातली बंदी! नेमकं प्रकरण काय?

राम गोपाल वर्मांच्या आगामी सिनेमावर बंदी घालण्यात आलीय
Ram Gopal Varma's upcoming movie 'Vyuham' has been banned by telangana high court
Ram Gopal Varma's upcoming movie 'Vyuham' has been banned by telangana high courtSAKAL

Ram Gopal Varma Vyuham Release Update: दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांच्या आगामी 'व्यूहम' सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला सातत्याने विरोध होत होता.

पण आता या सिनेमाबद्दल एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आलीय. तेलंगणा उच्च न्यायालयाने राम गोपाल वर्मांच्या 'व्यूहम'वर बंदी घातली आहे.

Ram Gopal Varma's upcoming movie 'Vyuham' has been banned by telangana high court
Megha Ghadge: "किंग कोरोना परत आलाय!", हॉस्पीटलमधून व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केली काळजी

व्यूहम सिनेमा काल म्हणजेच २९ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात होते.

न्यायमूर्ती सुरेपल्ली नंदा यांच्या न्यायालयाने राम गोपाल वर्मा दिग्दर्शित या चित्रपटाचे सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही रद्द केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने शुक्रवारी आदेश देताना या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलली. आता पुढील सुनावणी 11 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. या प्रकरणावर, 'व्यूहम'च्या निर्मात्यांनी आधी सांगितले होते की, "हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाने पास केला आहे, त्यामुळे त्याचे प्रदर्शन थांबवता येणार नाही."

कोर्टात आपले म्हणणे मांडताना राम गोपाल वर्मांनी म्हटले होते की, "कलात्मक अभिव्यक्ती दडपल्या जाऊ शकत नाहीत. तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) सरचिटणीस नारा लोकेश यांनी चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली होती. याचिकेत त्यांनी चित्रपटाचे निर्माते राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर त्यांनी याचिकेत या चित्रपटाचे वर्णन प्रचारात्मक चित्रपट असे केले आहे."

नारा लोकेश यांनी त्यांच्या याचिकेत स्पष्टपणे म्हटले आहे की, "चित्रपटात त्यांच्या नेत्याचे आणि पक्षाचे नाव वापरण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची उघडपणे बदनामी केली जात आहे."

या याचिकेवर न्यायमूर्ती सुरेपल्ली नंदा यांच्या न्यायालयात दिवसभर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपट निर्मात्यांची मतेही ऐकून घेतली.

सेन्सॉर बोर्डाने न्यायालयाला सांगितले की, "राम गोपाल वर्मा यांना चित्रपटाच्या सुरुवातीला एक ओळ जोडून डिस्क्लेमर बदलण्यास सांगितले होते. जेणेकरुन कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत"

आता राम गोपाल वर्मांच्या आगामी व्यूहम सिनेमा रिलीजपासून रखडणार, की त्याचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com