ज्येष्ठ दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे निधन

रविवार, 22 ऑक्टोबर 2017

लीडर, हम हिंदूस्थानी आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आलं. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 60 च्या दशकात त्यांनी बनवलेले लीडर आणि हम हिंदूस्थानी हे चित्रपट चांगलेच चर्चेत आले होते. राम मुखर्जी हे अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील होत. 

मुंबई : लीडर, हम हिंदूस्थानी आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाले. रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी इस्पितळात दाखल करण्यात आलं. परंतु डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 60 च्या दशकात त्यांनी बनवलेले लीडर आणि हम हिंदूस्थानी हे चित्रपट चांगलेच चर्चेत आले होते. राम मुखर्जी हे अभिनेत्री राणी मुखर्जीचे वडील होत. 

याबाबत माहिती देताना राम यांच्या पत्नी कृष्णा म्हणाल्या, 'त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित होती.त्यांना पहाटे अचानक रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. आम्ही तातडीने त्यांना डाॅक्टरांकडे घेऊन गेलो. पण काही उपयोग झाला नाही.' मुखर्जी यांनी दिलीपकुमार, वैजयंती माला यांना घेऊन लीडर बनवला. तर राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत ब्रेक देणारा राजा की आयेगी बारात हा चित्रपट ही त्यांची निर्मिती होती. 

Web Title: Ram Mukherjee, director passes away esakal news