Ram Setu: '...असे डायलॉग चालणार नाहीत' सेन्सॉर बोर्डाकडून 'कात्री'

सध्या त्याच्या रामसेतू नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यावरुन तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Ram Setu Movie News
Ram Setu Movie Newsesakal

Ramsetu Movie News: बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जाणारा हिरो आहे. भलेही त्याच्या काही चित्रपटांवरुन तो वादाच्या भोवऱ्यात सापडला असेल मात्र तो सतत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करत असतो. सध्या त्याच्या रामसेतू नावाच्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यावरुन तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

यंदाच्या वर्षात अक्षयचा पाचवा चित्रपट रामसेतू हा बॉक्स ऑफिसवर येणार आहे. या पाचपैकी त्याच्या एकाही चित्रपटाला अद्याप प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडनं अक्षयला मोठा झटका बसला होता. गेल्या वर्षी अक्षयचा सुर्यवंशी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची चाहत्यांनी बराचकाळ प्रतिक्षा केली होती. या चित्रपटानं प्रेक्षकांची निराशा केल्याचे दिसून आले आहे. आता त्याच्या रामसेतूची चाहत्यांना उत्सुकता आहे.

रामसेतू नुकताच सेन्सॉर बोर्डाकडे परिक्षणासाठी गेला होता. त्यांनी या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिले आहे. त्याचबरोबर सीबीएफसीनं कोणताही सीन डिलीट केलेला नाही. मात्र या दरम्यान वाद झाल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूड हंगामानं दिलेल्या एका रिपोर्टनुसार या चित्रपटातील काही डायलॉगमध्ये राम असा उल्लेख होता. मेकर्सला तो उल्लेख श्रीराम असा करण्यास सांगितला गेला होता. तसेच बुद्ध यांच्या नावाचा उल्लेखही भगवान बुद्ध असा करण्यास सांगितले गेले आहे.

Ram Setu Movie News
Prasika Vedpathak: 'जळू नका, बरोबरी करा!' नवऱ्याचा अपमान करणाऱ्यांना झापलं

याशिवाय काही संवाद बदलण्यास मेकर्सला सांगण्यात आले आहे. श्रीराम कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते. यासारखे संवाद बदलण्यास सांगितले गेले आहे. याचबरोबर फायरिंग सीनच्यावेळी देखील श्रीराम यांच्या घोषणेचा उल्लेख आहे तो हटवण्यास मेकर्सला सांगितले आहे. त्यामुळे अक्षयला काही करुन बोर्डाचे म्हणणे ऐकावे लागणार आहे.

Ram Setu Movie News
Prasad Vedpathak Tweet: 'मी एकवेळ माफ करेन पण बायकोच्या नादी लागू नका'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com