
घरी रामदास आठवलेच आणतात भाजी, कारण.. 'किचन कल्लाकार' मधील धमाल किस्सा
झी मराठीवरील (zee marathi) ‘किचन कल्लाकार’ (kitchen kallakar) हा कार्यक्रम सध्या गाजत आहे. या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तीं या कार्यक्रमात येऊन धमाल करतात. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा बाज या कार्यक्रमाचा आहे. या मंचावर यंदा रामदास आठवले येणार आहेत. अर्थात रामदास आठवले येणार म्हणजे धमाल, मस्ती आणि कविता तर होणारच... या मंचावर आठवले यांनी कविता करत एक किस्सा सांगितला.
हेही वाचा: Eknath Shinde : किरण मानेंनी सांगितलं बंडामागील 'मोठं कारण'
या कार्यक्रमामध्ये नुकतीच रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली. हा एपिसोड आज, 23 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मंचावर रामदास यांनी अत्यंत खुमासदार पध्दतीने एक कविता सादर केली. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांना विचारतो, 'भाजी आणण्यासाठी रामदास आठवले हे तुमची कधी मदत करतात का? यावर सीमा आठवले उत्तर देतात, 'तेच आणतात भाजी'. यानंतर रामदास आठवले एक भन्नाट कविता सादर करत म्हणतात,'मीच आणतो भाजी.. कारण मला लागते ताजी..' त्यांच्या या कवितेने मंचावरील वातावरण आनंदून जाते.
पुढे या कार्यक्रमातील प्रमुख, अभिनेता प्रशांत दामले हे रामदास आठवले यांच्याकडून खवय्ये नगरीच्या प्रगतीसाठी टिप्स द्यायला सांगितात. यावेळी रामदास आठवले म्हणतात, 'झी-टिव्हीचे आणि माझे जमले आणि इथे आले दामले' असा भन्नाट भाग प्रेक्षकांना आज रात्री पाहायला मिळेल.
Web Title: Ramdas Athawale Participate In Kitchen Kallakar Show On Zee Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..