esakal | बाहूबलीचा भाऊ भल्लाळदेवची ईडीनं केली चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

बाहूबलीचा भाऊ भल्लाळदेवची ईडीनं केली चौकशी

बाहूबलीचा भाऊ भल्लाळदेवची ईडीनं केली चौकशी

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडताना दिसत आहे. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींवर ईडीनं कारवाया केल्या आहेत. त्याचा फटका मोठमोठ्या अभिनेत्यांनाही बसला आहे. यापूर्वी अनेक कलाकारांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. आता त्यात बाहुबली या चित्रपटात त्याचा मोठा भाऊ म्हणून काम केलेल्या भल्लाळदेव अर्थात राणा दग्गुबातीला ईडीनं चौकशीसाठी बोलावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. राणाचं नाव आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. राणा हा सध्याच्या घड़ीला मनोरंजन क्षेत्रातील आघाड़ीचा अभिनेता आहे. तो सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोअर्स असणारा अभिनेता आहे. त्याची चौकशी सुरु असल्यानं मनोरंजन क्षेत्राबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

त्याचा विषय असा की, चार वर्षांपूर्वीच्या मनी लॉन्ड्रींग केस संदर्भात चौकशीसाठी राणा दग्गुतीला बोलावण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासंदर्भात एएनआयनं ट्विटही केलं आहे. 3 डिसेंबरला इडीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री रकुल प्रित सिंगची चौकशी केली होती. तिची पाच तास चौकशी झाली होती. तसेच पुरी जगन्नाथला 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. यावेळी 12 सेलिब्रेटींना नोटीस पाठविण्यात आली होती. 2017 पासून जवळपास आतापर्यत बारा जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. एसआयटीनं ही चौकशी केली होती. आता राणाची देखील काही तास चौकशी केली जाणार आहे.

एसआयटीनं 2017 मध्ये टॉलीवूड मधल्या अभिनेत्यांच्या विरोधात तपास करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये रवि तेजा, रकुल आणि आणखी काही सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली होती. एसआयटीनं टॉलीवूडमधील कलाकारांसहित 62 संशयितांकडून वेगवेगळे नमुने घेतले होते. मात्र अजुन पर्यत कोणत्याही सेलिब्रेटीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच टॉलीवूडमधला कोणताही कलाकार ड्रग्ज घेत असल्याची गोष्ट समोर आलेली नाही.

हेही वाचा: 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' मधील 'विघ्नहर्ता' पाहिलायं?

हेही वाचा: जगातील आठ क्रिकेटपटू ज्यांनी थाटला महिला खेळांडूंशीच संसार

loading image
go to top