राणा दग्गुबतीने शेअर केला 'हाथी मेरे साथी' चा टीजर

सकाळ वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

'हाथी मेरे साथी' चा टीजर पाहा" टीजरमध्ये राणा दग्गुबतीचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये केवळ एक डायलॉग आहे. जेव्हा कुणीतरी राणाला विचारते, "तू कोण आहेस ? देव ?" उत्तरात तो म्हणतो "वनदेव."

मुंबई : राणा दग्गुबती स्टारर 'हाथी मेरे साथी' चा टीजर बुधवारी रिलीज झाला. अभिनेत्याने ट्विटरवर 1 मिनिटांची क्लिप शेअर करून लिहिले, "उदय, क्रोध, गर्जना. जंगल वाचवण्याची लढाई सुरु झाली आहे.

वर्षाच्या सर्वात मोठ्या युद्धाचे साक्षीदार होण्यासाठी माझा चित्रपट 'हाथी मेरे साथी' चा टीजर पाहा" टीजरमध्ये राणा दग्गुबतीचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये केवळ एक डायलॉग आहे. जेव्हा कुणीतरी राणाला विचारते, "तू कोण आहेस ? देव ?" उत्तरात तो म्हणतो "वनदेव."

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रभु सोलोमनच्या दिग्दर्शनात बनलेला उयह चित्रपट 2 एप्रिलला रिलीज होईल. चित्रपटात राणाव्यतिरकीत पुलकित सम्राट, श्रिया पिळगांवकर आणि जोया हुसैनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, तर हा चित्रपट दिवंगत सुपरस्टार राजेश खन्ना यांना श्रद्धांजली आहे, ज्यांनी याच नावाने 1971 मध्ये चित्रपट केला होता. मात्र, नव्या 'हाथी मेरे साथी' ची कथा अगदी फ्रेश असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rana daggubati shared the teaser of hathi mere saathi