
काय !!! रणबीर आलियाचे लग्न झालेही...
Bollywood News : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. हे लग्न कधी होणार, कसे होणार, कोण पाहुणे असणार, हनीमून कुठे होणार अशा अनेक चर्चा सुरु आहेत. अनेकांनी तर १३ एप्रिलला मेंहदी, १४ ला संगीत, १५ ला हळद असे नाना तर्क लावले आहेत. रणबीर आणि आलिया यांनी देखील लग्नाबाबत बोलायचे टाळले आहे. पण रणबीरची आई नितू कपूर यांनी मात्र लग्नाबाबत मोठी माहिती उघड केली आहे. रणबीर आणि आलियाचे लग्न झालेही.. असे त्या माध्यमांना उत्तर देताना म्हणाल्या. पण त्या नेमक्या असे का म्हणाल्या हे सांगणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या उत्तराने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. शुक्रवारी, एका कार्यक्रमा दरम्यान रणबीरची आई नीतू कपूरला माध्यमांनी गाठून रणबीर आलियाच्या लग्नाबाबत विचारले. त्यावेळी नीत कपूर यांनी "भगवान जाने (देव जाणो)" असे उत्तर दिले.
हेही वाचा: दिग्पाल बनला बहिर्जी नाईक.. अंगावर काटा आणणारा लूक...
या व्हिडीओमध्ये, “ लग्नाची तारीख सांगा” असे एकाने नीतू यांना विचारले. त्यावेळी "कोणाची" असे उत्तर त्यांनी दिले. पुढे रणवीर आलियाच्या लग्नाची तारीख ठरली का, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या... ''देव जाणे.” नंतर, आणखी एकाने विचारले, ''काहीजण १४ एप्रिल म्हणत आहेत, काही १५ एप्रिल.. तुम्ही आम्हाला नेमकी तारीख सांगा..'' त्यावर नीतू म्हणाल्या.. "मी तर म्हणते.. त्यांचे लग्न होऊन गेले आहे."
हेही वाचा: या कलाकारांना 'रणबीर आलिया'च्या लग्नात आमंत्रण नाही, कारणही आहे धक्कादायक..
यापूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी या लग्नाबाबतच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. “मी सध्या मुंबईत नाही आणि मी लग्नाबद्दल काहीही ऐकले नाही. एवढं मोठं लग्न आमच्या घरी होत असेल तर कुणीतरी मला फोन करून माहिती दिली असती,'' असे ते म्हणाले होते.
२०१७ मध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. २०१८ मध्ये त्यांनी अधिकृतपणे आपले प्रेम जाहिर केले. २०२० मध्ये एका मुलाखतीत रणबीर म्हणाला होता, ''करोना नसता तर त्याच वर्षी लग्न केले असते.'' ही जोडी पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रमध्ये एकत्र दिसणार आहे.
Web Title: Ranbir And Alia Got Married Nitu Kapoor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..