रणदीप हुड्डाने ‘लॉकडाऊन’मध्ये विक्रमी नफा कमवणाऱ्या पारले-जी कंपनीला केली खास विनंती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

बॉलिवुड अभिनेता रणदीप हुड्डा याने ट्विट करत पारले-जी कंपनीकडे विशेष विनंती केली आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या उद्योगांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे, लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योग आर्थिक झळा सोसत असतानी देखील पारले-जी या बिस्कीटांच्या प्रसिध्द कंपनीने मागच्या 82 वर्षातील विक्रीचे रेकॉर्ड मोडीत काढत मागच्या आठ दशकातील सर्वाधीक फायदा झाल्याची माहीती पारले कंपनीकडून देण्यात आली आहे. तर बॉलिवुड अभिनेता रणदीप हुड्डा याने ट्विट करत पारले-जी कंपनीकडे विशेष विनंती केली आहे.

कोरोना महामारीचा असाही फायदा; पारले कंपनीची 8 दशकांतील विक्रमी कमाई

रणदीपने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात पारल-जी सोबतच्या आठवणीना उजाळा देत ट्विट केले आहे. त्याने लिहीले की, “माझं संपुर्ण करिअर आणि नाटकांमघ्ये काम करत असतानाचे दिवस पारले-जी आणि चहा यांच्याशी जोडलेले आहेत. फक्त पारले-जी कंपनीने जरी पॅकेजींगसाठी प्लास्टीक एवजी पर्यावरण पुरक  (बायोडीग्रेडेबल मटेरिअ) पदार्थ वापरणे सुरु केले तर सिंगल यूज प्लास्टीकच्या वापरात मोठी घट होईल. आता तुमची विक्री तर चांगली होत आहेच, तर आता तुम्ही आपल्या चांगल्या भविष्यासाठी देखील योगदान देऊ शकाता.” खाद्यापदार्थांच्या पॅकेजींगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. 

 

 

रणदीप हा पर्यावरन प्रेमी आहे, त्याच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातुन तो नेहमीच पर्यावरणाशी संबंधीत फोटो तसेच व्हिडीओ शेअर करत असतो. भारतात याआधीपासून सिंगल यूज प्लास्टीकवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. देशातील काही राज्यात प्लास्टीकच्या वापरावर बंदी देखील घालण्यात आली आहे. त्यासाठी सरकारकडून देखील एकदाच वापरले जाणाऱ्या प्लास्टीकच्या वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Randeep hooda special appeal to parle-g for its packing after record sales of biscuits during lockdown