दिग्दर्शकानं कट म्हटल्यावरही दीपवीर करतच राहिले...

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

आम्हाला सर्वांनाच वाटायचं की या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी सुरु आहे. 'अंग लगा दे रे'च्या शूटिंगच्या वेळी दोघांच्या प्रेमाची माहिती सर्वांना समजली.

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा किसिंगचा सीन शूट सुरू होता. दिग्दर्शकांनी कट म्हटले पण हे दोघे एकमेकांना किस करत राहिले. त्यावेळी उपस्थित असलेले सर्वच जण अवाक झाले अन् समजून गेले.

बॉलिवूडचे बाजीराव मस्तानी अर्थात रणवीर-दीपिका यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस. दोघांनी 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमो येथे विवाह केला. दीपिका-रणवीरची ऑनस्क्रीन पेक्षा ऑफस्क्रीन केमिस्ट्री सर्वात जास्त गाजली. रणवीरने दीपिकाला प्रथम एका कार्यक्रमादरम्यान पाहिले होते. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी 2013 मध्ये त्यांना 'रामलीला' या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आणले. दोघांमध्ये यादरम्यान जवळीक वाढायला सुरुवात झाली. या चित्रपटात अनेक रोमँटिक सीन आहेत.

या चित्रपटाच्या सेटवरील क्रू-मेंबरने सांगितले, 'आम्हाला सर्वांनाच वाटायचं की या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी सुरु आहे. 'अंग लगा दे रे'च्या शूटिंगच्या वेळी दोघांच्या प्रेमाची माहिती सर्वांना समजली. या गाण्यातील एक किसिंग सीन उपस्थितांपैकी कोणीच विसरू शकत नाही. रणवीर आणि दीपिकाच्या किसिंगचे शुटींग सुरू होते. दिग्दर्शकांनी कट म्हटल्यानंतरही दोघे एकमेकांना किस करत राहिले.'

दीपिका आणि रणवीर एकत्र येण्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दोघांनी भन्साळीच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या 3 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी रणवीर-दीपिका तिरूपतीला गेले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh deepika padukone wedding anniversary