esakal | आला रे आला, 'सिंबा' आला (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

simmba

सिंघम अजय देवगणच्या एन्ट्रीनेच या चित्रपटाच्या ट्रेलरला सुरवात होते आणि पुढे आला रे आला, सिंबा आला हे दाखविण्यात आले आहे. गोव्यातील शिवगडमधील ही कथा असून, सिंबा हा सिंघमचा फॅन दाखविला आहे. सिंबा हा पोलिस अधिकारी दाखविला आहे. करण जोहरचे धर्मा प्रॉडक्शन, रोहित शेट्टी आणि अपूर्व मेहता हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

आला रे आला, 'सिंबा' आला (व्हिडिओ)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : नुकताच विवाहबद्ध झालेला अभिनेता रणवीर सिंग याचा बहुचर्चित अॅक्शनपट 'सिंबा' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. देशभरात 28 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'सिंघम'सारखा अॅक्शनपट देणारा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणवीरसह सारा अली खान दिसणार आहे. तर, खलनायिकाच्या भूमिकेत सोनू सूद आहे. दीपिकाबरोबरच्या लग्नानंतर 'सिंबा'चा ट्रेलर प्रदर्शित होत असल्याने रणवीरला चित्रपटाच्या यशाबद्दल उत्सुकता आहे. 