Rashmika Mandanna: 'पुष्पा २' नंतर रश्मिकाचं मोठं 'स्पिरिट', प्रभाससोबत दिसणार! संदीप रेड्डी वांगा करणार दिग्दर्शन?

आता रश्मिका प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी एका (Sandeep Reddy Vanga) प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Rashmika Mandanna to cast in prabhas
Rashmika Mandanna to cast in prabhas esakal

Rashmika Mandanna to cast in prabhas : अल्लु अर्जुनच्या पुष्पा द राईजमधून रश्मिका ही नॅशनल क्रश (Allu Arjun Pushpa 2) झाली. त्यापूर्वी तिच्या अनेक चित्रपटांनाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र जेव्हा पुष्पा आला तेव्हा तिच्या नावाची मोठी क्रेझ तयार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर रश्मिकाकडे वेगवेगळ्या प्रोजेक्टची रांग लागली होती.

आता रश्मिका प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या आगामी एका (Sandeep Reddy Vanga) प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या वर्षी याच दिग्दर्शकाचा अॅनिमल नावाचा चित्रपट प्रदर्शित (Animal Movie) झाला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तब्बल आठशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. सध्या त्याच्या सिक्वेलची चर्चा रंगली आहे.

रश्मिका ही सध्या अल्लु अर्जुनच्या पुष्पा २ द रुल नावाच्या चित्रपटाच्या (national Crush rashmika News) चित्रिकरणात व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यात तिची आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे रश्मिका आणि प्रभास हे एकत्र स्क्रिन शेयर करणार आहेत. ती रेड्डी वांगाच्या स्पिरिट नावाच्या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे सांगण्यात (Latest Entertainment News) येत आहे. सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून त्याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

व्हायरल झालेली ही माहिती खरी असल्यास रश्मिकाचा हा प्रभाससोबत (Rashmika Prabhas Movie) पहिलाच चित्रपट असेल. तर संदीप वांगा रेड्डीसोबत तिचा दुसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी तिनं अॅनिमलमध्ये रणबीर कपूर सोबत स्क्रिन शेयर केली होती. त्याचे दिग्दर्शन संदीप वांगा रेड्डीनं केलं होतं. त्यातील रश्मिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

प्रभास आणि रश्मिकाच्या स्पिरीट बाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी कदाचित याच वर्षी सप्टेंबर २०२४ मध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.यामुळे स्पिरीट विषयी चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. सध्या रश्मिका ही हैद्राबादमध्ये पुष्पा २ च्या शुटींगमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी तिच्या या चित्रपटाचे चित्रिकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या चित्रपटातील एका कलाकाराच्या आत्महत्याचा प्रकार समोर आला होता.

रश्मिकाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती अल्लु अर्जुनसोबत पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. त्यात तिनं श्रीवल्ली नावाची भूमिका साकारली आहे. तसेच ती रेनबो आणि गर्लफ्रेंड नावाच्या तेलुगू चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. तसेच विकी कौशल सोबत छावा नावाच्या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com