घरातील प्रत्येक नोकराच्या रोज पाया पडते रश्मिका..कारण ऐकाल तर व्हाल भावूक | Rashmika Mandanna News | Entertainment News in Marathi | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandanna News

Rashmika Mandanna: घरातील प्रत्येक नोकराच्या रोज पाया पडते रश्मिका..कारण ऐकाल तर व्हाल भावूक

Rashmika Mandanna News: रश्मिका मंदाना 'पुष्पा' सिनेमानंतर नॅशनल क्रश बनली आहे. साऊथच्या प्रेक्षकांसोबतच हिंदी प्रेक्षकांच्या मनातही तिच्यासाठी एक खास जागा आहे. तिनंं नुकत्याच दिलेल्या मुलाखती दरम्यान आपल्या रोजच्या डेली रुटीनविषयी बातचीत केली.

यामध्ये तिनं काही अशा गोष्टी शेअर केल्या ज्या खरंतर प्रत्येकाला शिकायला हव्यात. रश्मिका आयुष्यातील खूप छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देते. तिनं सांगितलं की ती तिच्या कुटुंबातील मोठ्यांचेच नाही तर घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या देखील पाया पडून आशीर्वाद घेते.

रश्मिकानं यामागचं एक खास कारणही सांगितलं.(Rashmika Mandanna touches her house helper feet know the interesting reason)

रश्मिका मंदाना साऊथ आणि हिंदी सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण असं असलं तरी तिच्या आई-वडीलांना याचा गर्व नाही. ते तिला खूप साधारण मुलीसारखेच वागवतात.

रश्मिकानं बाजार इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले.

रश्मिका म्हणाली,''माझ्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी माझ्या आई-वडीलांसोबत वेळ घालवते. माझ्या मित्र-मैत्रिणींना भेटते. यामुळे मला आनंद मिळतो.

शब्दात खूप ताकद असते आणि ते आपल्याला चांगलं माणूस बनवू शकतात किंवा बिघडवू देखील शकतात. त्यामुळे कोणी मला काही समजवत असेल किंवा सांगत असेल तर ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे''.

''मी घरी आल्यावर माझ्या डायरीत खूप छोट्या छोट्या गोष्टींची नोंद करून ठेवते. माझी एक सवय आहे की मला आदर म्हणून कुणाच्याही पाया पडायला लाज वाट नाही''.

''मी माझ्या घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या देखील पाया पडते. मी तिथे भेदभाव करत नाही. मी सगळ्यांचा आदर करते..मी अशीच आहे''.

रश्मिकाला जेव्हा विचारलं गेलं की,'तुझ्या आई-वडीलांना तुझा खूप अभिमान वाटत असेला ना?' तेव्हा रश्मिका पटकन म्हणाली, ''नाही..कारण माझं कुटुंब सिनेमाशी कनेक्टेड नाही.त्यांना नाही माहित त्यांची मुलगी काय करतेय. पण जेव्हा मला पुरस्कार मिळतो तेव्हा मात्र ते खूश होतात''.

''माझ्या पालकांनी माझं संगोपन एक मुलगी आहे हिचं कसं होणार,इथे जाऊ नको ,तिथे जाऊ नको असं कोँणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता केलं आहे. त्यांनी मला ती प्रत्येक गोष्ट दिली आहे जी आपल्या मुलांना पालक देतात. त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. आता त्यांची काळजी घेण्याची वेळ माझी आहे''.