
Ratna Pathak Shah: 'आपण अजुनही मागासच' का म्हटली अभिनेत्री असं?
Bollywood Ratna pathak shah: बॉलीवूडमध्ये आपल्या परखड मतांसाठी ओळखले जाणारे जे सेलिब्रेटी आहेत त्यात प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्या ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्गीन शहा यांच्या (Naseeruddin shah) पत्नी आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर सडेतोडपणे प्रतिक्रिया देणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये रत्ना पाठक शहा यांच्या नावाचा समावेश होतो. त्यांनी आता भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात होणाऱ्या तुलनेवर (bollywood actress) प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रत्ना शहा काय म्हणाल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
आपण जर स्वताची तुलना सौदी अरेबियाशी करत असू तर मग काही बोलायलाच नको. आपण पुन्हा त्या धर्माच्या बेडीत अडकत चाललो आहोत असे म्हणायला हरकत नाही. टोकाची पुराणमतवादी दृष्टिकोन आपण अंगीकारत असल्याचे मला वाटते. भारतातील समाजाला जर सौदी अरेबियातील नागरिकांसारखे व्हायचे असेल तर मग त्यांनी त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेत नाही ती म्हणजे आपण जेव्हा धर्माच्या, जातीच्या जोखडात बांधलो जातो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या मर्यादा आपल्यावर येतात. त्याचे पहिले उदाहरण स्त्री आहे.
भारतीय स्त्रीं यांना कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र तरीही आपण त्याच त्याच गोष्टींना आपल्या मनाप्रमाणे रंग देतोय. यावेळी रत्ना पाठक शहा यांनी 21 व्या शतकातील भारतीय स्त्री यावर आपली मतं मांडली आहेत. आपण 21 व्या शतकात राहतो आणि अजुनही उपवास. करवा चौथ, असे प्रकार करतो. हिंदू धर्मात पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. रत्ना आणि नसिरुद्दीन शहा यांच्या लग्नाला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलेही आहेत. त्यांची नावं इमाद शहा आणि विवान शहा.
हेही वाचा: Bollywood च्या भाईजानची टॉलीवूडवर मोठी प्रतिक्रिया; म्हणाला,'आता..'
रत्ना यांच्या म्हणण्यानुसार, भारतात अजुन फार काही बदललं आहे असे मला तरी वाटत नाही. स्त्रीयांचे प्रश्न जे आहे तेच आहे. त्यांच्यावर होणार अन्याय जो पूर्वी होता तोच आहे. बलात्कार, अत्याचार, त्यांना दिला जाणारा शारिरिक, मानसिक त्रास तोच आहे. त्यांना केली जाणारी मारहाण, त्यांचे प्रश्न जे होते तेच आहेत. आपण आणि आपला समाज हा आणखी मागासलेला, पुराणमतवादी होत चाललो आहोत. अशी खंत रत्ना शहा यांनी यावेळी बोलून दाखवली आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले आहेत.
हेही वाचा: Viral Video: Aaradhya Bachchan मुळे ऐश्वर्या-अभिषेकची पंचाईत, मीडियासमोरच..
Web Title: Ratna Pathak Shah Comment On India Like Saudi Arabia Moving Towards Extremely Conservatism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..