Raveena Tandon: मी पैसे देते.. जा.. मोतीबिंदूचं ऑपरेशन करा.. 'या' कारणाने भडकली रवीना टंडन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tandon gives epic reply to troll who compared her with Twinkle Khanna, says, ‘Apna cataract ka surgery karwao’

Raveena Tandon: मी पैसे देते.. जा.. मोतीबिंदूचं ऑपरेशन करा.. 'या' कारणाने भडकली रवीना टंडन..

Raveena Tandon: 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि ट्विंकल खन्ना या दोघी एक आहेत की जुडवा आहे अशा प्रश्न अनेकांना पडत होता. बहुतेक लोकांना रवीना आणि ट्विंकल या दोघींमध्ये कधी फरक समजला नाही. ज्यामुळे लोक या दोघांना ओळखण्यात गोंधळात पडत होते आणि त्यांच्या नावांबद्दलही गोंधळ होत होतता. आता पुन्हा तशीच गफलत झाली आहे.

अलीकडेच एका चाहत्याने रवीनाची तुलना ट्विंकलशी केली, ज्याला रवीना टंडनने मजेशीर उत्तर दिले आहे. किंबहुना रवीनाचे उत्तरहा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

(Raveena Tandon gives epic reply to troll who compared her with Twinkle Khanna, says, ‘Apna cataract ka surgery karwao’)

हेही वाचा: प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Balasaheb Thackeray Jayanti: शिवसेनेची रुग्णवाहिका होती म्हणून वाचले अमिताभ.. जबरदस्त किस्सा..

अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बोल्ड स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. रवीना टंडन अनेकदा आपले मत स्पष्ट मांडताना दिसली आहे. रवीना टंडनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर आस्क मी सेशन ठेवले होते, ज्याद्वारे लोकांनी रवीनाला विविध प्रश्न विचारले, ज्यांना रवीना टंडनने उत्तरे देखील दिली. दरम्यान, एका चाहत्याने रवीना टंडनला सांगितले की, 'लहानपणी रवीना आणि ट्विंकल खन्नाच्या लूकबद्दल ती खूप गोंधळलेली असायची'.

ज्याला रवीना टंडनने मजेशीर उत्तर दिले की, 'तुम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन करा, त्यासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था केली जाईल.' रवीना टंडनचे हे उत्तर चांगलेच गाजत आहे. किंबहुना यानंतर रवीना टंडनची पुन्हा ट्विंकल खन्नासोबत कोणीही तुलना करणार नाही.

रवीना टंडनने गेल्या वर्षी ''केजीफ-चॅप्टर २'' मध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडली.आता रवीना टंडन 'घुड़चढ़ी' आणि अरबाज खान बरोबर 'पटना शुक्ल'' या चित्रपटात दिसणार आहे.