रविना टंडनने लग्नासाठी आपल्या पतीला घातली होती 'ही' अट...Raveena Tandon,anil thadani,bollywood actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tandon

रविना टंडनने लग्नासाठी आपल्या पतीला घातली होती 'ही' अट...

'टीप टीप बरसा पानी' या गाण्यात पिवळ्या रंगाच्या साडीत मादक अंदाजात नृत्य करून घायाळ करणारी रविना टंडन(Raveena Tandon) आज वयाच्या ४६व्या वर्षीही तितकीच सुंदर आणि हॉट दिसते. तसं पहायला गेलं तर आज रविना एकूण चार मुलांची आई आहे. त्यातील दोन मुली रविनानं दत्तक घेतल्या आहेत जेव्हा तिचं लग्न झालं नव्हतं. आणि ती फक्त २१ वर्षांची होती. तिला घरातनं सांगण्यात आलं,'अजून तू व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभी नाहीस आणि तू दोन मुलींची जबाबदारी अंगावर घेत आहेस'. पण रविनाने कोणाचं ऐकलं नाही. तिनं दोन मुली दत्तक घेतल्या. तिच्या मोठ्या मुलीत आणि तिच्यात फक्त ११ वर्षांचं अंतर आहे.

Raveena Tandon with their daughter's and son,Husband Anil Thadani,

Raveena Tandon with their daughter's and son,Husband Anil Thadani,

रविनानं जेव्हा मुली दत्तक घेतल्या तेव्हा तिला असंही सांगण्यात आलं की, 'तुझ्यासोबत कुणी लग्न करणार नाही'. पण तिने ती गोष्ट मनावर घेतली नाही. अखेर २००३ मध्ये जेव्हा तिचं सूत फिल्म वितरक अनिल थडानी सोबत जुळलं तेव्हा तिनं त्याला अट घाटली. ती आपला भावी पती अनिल थडानीला म्हणाली,''जर तुला माझ्याशी लग्न करायचे असेल तर तुला माझ्यासोबत माझ्या दत्तक मुलींचाही स्विकार करावा लागेल. त्यांच्यावर माझ्याइतकंच प्रेम करावं लागेल''. अनिल थडानीनं रविनाच्या प्रेमाखातर अट मान्य केली. पण त्यानंही आजतागायत आपल्या दत्तक मुलींवर वडीलांसारखं प्रेम केलंय हे अनेकदा दिसून आलं. आज रविनाच्या दोन्ही दत्तक मुलींची लग्न झाली आहेत. त्यांना मुलंही आहेत. म्हणजे रविना-अनिल आजी आणि आजोबा झाले आहेत.

हेही वाचा: सध्यातरी माझ्याकडे 'रणबीर' विषयावर तुमच्यासाठी चांगलं उत्तर नाही...

अनिल आणि रविना २००४ मध्ये विवाहबद्द झाले. त्या दोघांना एक मुलगी आणि मुलगा अशी दोन मुले आहेत. रविना टंडन आता 'अरण्यक' या वेब सिरीजमध्ये पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. आज १० डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर ही सिरीज आपल्या भेटीस आली आहे.

Web Title: Raveena Tandon Reveals Condition She Set Before Marrying Anil Thadani Ppm81entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top