Raveena Tondon : 'तुमचं लग्न मोडलं होतं ना?' रविनाला अक्षयवरुन डिवचल्यानं अभिनेत्रीचा संताप

असं म्हटलं जातं की ९० च्या दशकामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणून अक्षय आणि रविनाकडे पाहिले जात होते. रविनाचा चाहतावर्ग मोठा आहे.
Raveena Tondon
Raveena Tondonesakal

Raveena Tondon bollywood actress angry akshay kumar : बॉलीवूडची अभिनेत्री रविना टंडन ही तिच्या परखड स्वभावाबद्दल ओळखली जाते. आपलं म्हणणं ठामपणे मांडत प्रसंगी त्यासाठी कुणाशीही पंगा घेण्याची तयारी दाखवणाऱ्या रविनाचा नेटकऱ्यांवर संताप दिसून आला आहे. लोकं अजुनही भुतकाळातल्या गोष्टी का उगाळत बसतात असा प्रश्न तिनं यावेळी केला आहे. अक्षय कुमारच्या निमित्तानं रविना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

असं म्हटलं जातं की ९० च्या दशकामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणून अक्षय आणि रविनाकडे पाहिले जात होते. रविनाचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्रीनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.आजही रविनाचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताच त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. सध्या रविनाला नेटकऱ्यांनी त्या गोष्टीची आठवण करुन दिल्यानं ती रागावली आहे.

Also Read - प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

नेटकऱ्यांनी तिला तुमचं लग्न मोडलं होतं ना...नेमकं काय झालं होतं...अशाप्रकारचे प्रश्न विचारले आहेत. त्यावर रविनानं त्यांना चांगलेच झापले आहे. तुम्हाला दुसरं काही काम नाही का, अजुन किती दिवस तेच ते जुने किस्से, आठवणी, प्रसंग यांची चर्चा करत बसणार, असं रविनानं म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मुलाखतीमध्ये तिनं आणि अक्षयच्या रिलेशनशिपवरुन नेटकऱ्यांवर राग व्यक्त केला आहे.

मोहरामध्ये आम्ही एकत्र काम केले होते. त्याची चर्चाही झाली होती. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिटही झाला होता. माझं त्या चित्रपटातील गाणं गाजलं. त्याचवेळी माझं नाव अक्षयशी जोडलं जाऊ लागलं. लोकं आजही त्या गोष्टी विसरायला मागत नाही. त्यावरुन आम्हाला ट्रोल करतात हे चुकीचे आहे. शेवटी आपण आणखी किती दिवस त्याच गोष्टींना आठवत बसणार. अशा शब्दांत रविनानं आपला राग व्यक्त केला आहे.

Raveena Tondon
Akshay Kumar: भारताच्या नकाशावर पाय दिल्याने अक्षय कुमार ट्रोल, नेटकरी म्हणाले - 'लाज नाही वाटत का?'

रविना अक्षयचा मोहरा हा चित्रपट १९९४ मध्ये आला होता. त्यानंतर त्यांनी १९९५ पासून एकमेकांना डेट करण्यास सुरुवातही केली होती. त्यांचे लग्नही होणार होते. मात्र काही कारणास्तव ते लग्न होऊ शकले नाही. मात्र चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना त्यांच्या त्या वैयक्तिक गोष्टीत रस असल्यानं त्यावर नेहमीच चर्चा होत असते.

Raveena Tondon
Kiara-Sidharth Wedding Photo : 'तेरी मेरी गल्लां हो गई मशहूर...' शेरशाहचा शाही विवाहसोहळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com