Ravrambha: मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसतानाच 'रावरंभा' चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले..

मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आता ऐरणीचा विषय झाला आहे.
Ravrambha marathi movie release date postponed
Ravrambha marathi movie release date postponed sakal

Ravrambha Movie News: सध्या मराठी चित्रपट हा मोठा चर्चेचा विषय झाला आहे. कारण आशय आणि विषयाचा दर्जा असूनही अनेक समस्या मराठी चित्रपटापुढे उभ्या राहिल्या आहेत. कुठे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीय तर कुठे थिएटर मिळून प्रेक्षक नसल्याने मराठी चित्रपट मागे पडत आहे.

काही दिवसांपूर्वी २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट सुरुवातीच्या काही दिवसात तेजीत होता पण नंतर याही चित्रपटाची कमाई मंदावली. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'TDM' ला मात्र थिएटरच मिळाले नाही. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनच थांबवण्यात आले.

त्यानंतर 'बलोच' हा प्रवीण तरडे यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला पण त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी' मुळे याही चित्रपटाचे गणित बिघडले. सध्या बॉक्स ऑफिसवर 'द केरळ स्टोरी'चीच हवा होताना दिसत आहे.

अशातच 'रावरंभा' या मराठी चित्रपटाने मोठा निर्णय घेतला आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे हा चित्रपट पुढे ढकलल्याचे चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केले. पण यामध्ये मराठी चित्रपटापुढे उभे असलेल्या समस्याच कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
(Ravrambha marathi movie release date postponed cast om bhutkar )

Ravrambha marathi movie release date postponed
Prakash Raj: ५६ इंचाची छाती असणारे सेल्फी किंग मोदी आता कुठे आहेत? प्रकाश राज यांची पंतप्रधानांवर टीका..

इतिहास नेहमीच शौर्याने, पराक्रमाने, तर कधी कधी अनेक षडयंत्रांनी भरलेला असतो. ऐतिहासिक काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला.

याच यादीत एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. 'रावरंभा' हा इतिहासाचा काहीसा दुर्लक्षित ‘प्रेम अध्याय’ १२ मे रोजी मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार होता. पण आता मात्र हा चित्रपट १२ मे ऐवजी २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. काही तांत्रिक गोष्टींमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन दोन आठवडे पुढे ढकलण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सध्या मराठी चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन मोठा वादाचा मुद्दा झाला असून अनेकजण त्यावर भाष्य करत आहेत. काही दिवसांपूर्वीच केदार शिंदे यांनी 'द केरळ स्टोरी'ला अनुदान मिळावे या मागणीवर टीका केली होती. आता 'रावरंभा'चेही प्रदर्शन पुढे ढकलल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

दमदार कलाकारांची फौज असलेला आहे रावरंभा..

रावरंभा चित्रपटात ‘मुळशी पॅटर्न’मधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल या चित्रपटातून जोडीच्या रूपाने समोर येणार आहेत.

तर या चित्रपटात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार असून यांच्यासोबत संतोष जुवेकर, कुशल बद्रिके, अपूर्वा नेमळेकर, मीर सरवर, किरण माने, रोहित चव्हाण, पंकज चव्हाण, अश्विनी बागल, मयुरेश पेम, अश्विनी बागल, विनायक चौघुले, शिवम देशमुख, कुणाला मसाले, आदर्श जाधव, रुक्मिणी सुतार, शशिकांत पवार आदि कलाकारांच्या ही भूमिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com