देवाक काळजी रे...

हेमंत जुवेकर
बुधवार, 23 मे 2018

रेडू नावाचो पिक्चर बगलंय म्हणूनच सांगाक होया, पण त्येचार पण प्रश्न येयतच... कायरे, म्हशीवर हा की काय ह्यो पिक्चर? तर त्येच्यासाठी सांगूक होया, रेडू म्हंजे प्राणी नाय... रेडू म्हंजे आकाशवाणी, रेडियो, रेडियो! 

रेडू बगलंय परवा. खरातर असा कोणाक सांगाची पण सोय नाय. सांगला तर, 'मॅड झालंस काय?' असलो प्रश्न विचारणारे मोप भेटतील. रेडू खयव दिसात, त्येच्यात सांगन्यासारख्या ता काय? ह्यो प्रश्न त्या प्रश्नामागे असतलोच. 
तेवा, सांगाचा तर, रेडू नावाचो पिक्चर बगलंय म्हणूनच सांगाक होया, पण त्येचार पण प्रश्न येयतच... कायरे, म्हशीवर हा की काय ह्यो पिक्चर?   
तर त्येच्यासाठी सांगूक होया, रेडू म्हंजे प्राणी नाय... रेडू म्हंजे आकाशवाणी, रेडियो, रेडियो! 

सत्तरच्या दशकात जेवा टिव्हीचा फॅड नव्हता, तेवा रेडियो म्हंजे भारीच गोष्ट होती. स्टेसट सिंबल. संध्याकाळचे बातम्यो, रात्रीची आपली आवड, श्रुतिका एेकूक गावच्या घराच्या अंगणात जमलेला आजुबाजुचा लंटाबर आटावता काय कोनाक? तर, ही त्या काळची गोष्ट हा. तीव कोकणातली. 
कोकणात खयवं दिसणारी गरिबी, हातावरचा पोट नी टोपी उडवनारी टोकदार भाषा ही कोकणातली सारी आक्रिता या रेडूत भेटतंत. खरा सांगायचा तर आपापलो गावच भेटता हो पडद्यार. गाव दिसाक लागलो की गाववाले पन दिसतलेच. दिसतत ते शंशांक शेडे नी छाया कदम ह्येचा रुपात. शेड्यांनी तसा काम चागला केल्यानी पन त्या छायान त्येच्या बायलोचा सोंग भारीच काडला हा. त्येचा मालवणी पण भारीच. येकदम अस्सल. नायतर गुदस्ता इलेले मालवणी फोडणी दिल्ले सिरियल बगलास? तेतूरला  मालवणी म्हंजे... म्हणतत ना, 'समाजना नाय उमाजन नाय, आणि म्हणतंत माझा...'  
फरकच सांगूचो तर त्येच्यातला मालवणी अळणी नी ह्येच्यातला मालवणी मस्त झनझनीत. ता शिरियलमदला एेकताना, शिरा पडली ह्येचा तोंडार सारके शब्द येयत, पन ह्याे पिक्चर बगताना कोनव म्हणात,  आवशीक खाव, खयंचे रे ह्ये? 

तर मालवणी भाषेतल्या या पिक्चरची खासियत हीच की तो आमका आमच्या गावची आठवण देता. ह्येच्यात दिसणारी मानसा आपल्याक कदी ना कदी भेटलेली दिसलेली वाटतंत. बाकी कथेचा म्हनशाल तर खूप मोठी गजाल काय नाय त्येच्यात. रेडियोचीच गजाल ती, रेडियोसाठी मॅड झालेल्या तातूची, नी रेडियोनच शानो केलेलो तातूची गोष्ट सांगता ह्यो सिन्मा. 
दिग्दर्शक सागर छाया वंजारीन ह्याे मालवणी चित्रपट काडूचा धाडस केल्यान, पिक्चर पण चांगलो झालोहा, त्येचा कौतुक आपण तरी करुकच होया. 

पण मी काय तुमका तो जावन बगा असा कायव सांगूचंय नाय... कारण माका म्हायती हा, मी जर असा सांगलंय तर तुम्ही म्हणताला, इलो मोटो शिकवनारो... तेवा तुमका वाटला तरच जावन बगा हा... ताव लवकरात लवकर ठरवा... नुसतोच विचार करीत बसशात तर या रेडूचा `देवाक काळजी रे` ह्या मस्त गाणा तुमका एेकूक-बगुक नाय मिळाचा. (गोगावलेच्या अजयान ता काय मस्त म्हटल्यान हा...) तेवा रेडू बगुन घेवा... गाण्यासाठी, मालवणी बाण्यासाठी आणि डोळ्यातल्या पाण्यासाठी...आणि तुमचा ठराक उशीर झालो तर? देवाक काळजी!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: redu movie song devak kalji re