rekha viral video Playfully 'Slaps' A Man After Posing For Selfie - VIRAL VIDEO
rekha viral video Playfully 'Slaps' A Man After Posing For Selfie - VIRAL VIDEO SAKAL

Rekha Video: फोटो काढायला आलेल्या फॅनला रेखाने मारली चापट, पुढे घडलं असं काही की..., व्हिडीओ व्हायरल

रेखा आणि त्यांच्या फॅनचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय
Published on

Rekha Viral Video News: रेखा या बॉलिवूडमधल्या ज्येष्ठ अभिनेत्री. रेखा काही वर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय नसल्या तरी त्या अनेक बॉलिवूड इव्हेंट आणि पार्टीला हजेरी लावत असतात.

रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. रेखा यांनी त्यांच्या एका फॅनला चापट मारली. मग पुढे एक खास गोष्ट घडली. जाणुन घ्या.

rekha viral video Playfully 'Slaps' A Man After Posing For Selfie - VIRAL VIDEO
Supriya Sule: कोण जास्त प्रभावी उपमुख्यमंत्री अजित पवार की देवेंद्र फडणवीस ? बघा सुप्रिया सुळेंनी काय दिलं उत्तर

रेखा यांचा व्हिडीओ नेमका काय?

रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत रेखा यांचा एक फॅन त्यांच्यासमोर अचानक येऊन उभा राहतो. तेव्हा रेखा त्याला चापट मारतात.

हा व्हिडीओ पाहून रेखाने हे काय केलं असा प्रश्न अनेकांना पडला. अनेकांनी रेखाच्या वागण्याबद्दल गैरसमज करुन घेतला. पण पूर्ण व्हिडीओ पाहून मात्र रेखाचं कौतुक केलं.

रेखाच्या व्हिडीओमध्ये असं दिसतं की, रेखा एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये घाईघाईत जात असतात. अशातच एक फॅन तिच्यासमोर फोटो काढण्याचा आग्रह धरतो. रेखा फोटो काढतात आणि त्या फॅनला लाडाने एक चापट मारतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

रेखा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होतोय. रेखा यांच्या या व्हिडीओवर त्यांच्या फॅन्सनी लय भारी कमेंट केल्यात.

रेखा सध्या कोणत्याही माध्यमात काम करत नाहीत. तरीही त्यांचे प्रचंड फॅन फोलोईंग आहे. रेखा यांना भेटायला कायमच त्यांचे चाहते आतुर असतात. रेखा यांचा हा व्हिडीओ पाहून त्या त्यांच्या चाहत्यांवर किती प्रेम करतात, हे पुन्हा एकदा समोर आलंय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com