esakal | Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'
sakal

बोलून बातमी शोधा

republic day 2021 special best patriotic filmy dialogues in Bollywood

सनी देओलच्या मॉ तुझे सलाम या चित्रपटातील हा संवाद कमालीचा लोकप्रिय तर झालाच पण त्याला मोठ्या वादालाही सामोरं जावं लागलं होतं.

Bollywood patriotic dialogues 'दुध मांगोगे तो खिर देंगे कश्मिर मागोंगे तो ...'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असा वाटणारा आजचा दिवस. यावर्षी आपण 72 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. देशभक्तीचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी बॉलीवूडचेही मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या चित्रपटातून लोकांच्या मनात देशभक्तीची बीजं पेरली असे म्हणता येईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं घेतलेल्या अशा काही चित्रपटांचा आढावा घेतला आहे ज्यातील संवादानं प्रेक्षकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा तेवत ठेवली. प्रेक्षकांच्या मनावर त्या चित्रपटांनी केलेलं गारुड कायम आहे.

लोकशाही, तिची मुल्ये, त्याचे महत्व पटवून देण्याचे काम या चित्रपटांनी केले. यातील काही चित्रपटांना त्यातील वादग्रस्त संवादामुळे मोठ्या टीकेला तोंड द्यावे लागले होते. मात्र प्रेक्षकांच्या मनावर त्या चित्रपटांनी उमटविलेला ठसा कायम आहे. प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन असो हे चित्रपट प्रेक्षकांना देशाला मिळालेले स्वातंत्र्य किती प्रयासानं मिळालं आहे याची आठवण करुन देतात. विशेषत तरुणाईच्या मनात स्वदेश आणि त्याचे महत्व पटवून देण्यासाठी मोलाची भूमिका पार पडतात. असे सांगता येईल.

* गदर एक प्रेम कथा
अभिनेता-सनी देओल
देशभक्ति डायलॉग- हमारा हिंदुस्तान जिंदाबादा था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा
गदर चित्रपटाची गोष्टच वेगळी होती. तो ज्यावेळी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी त्या चित्रपटातील संवादानं प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. भारतातील एक युवक आणि पाकिस्तानातील मुलगी यांच्यातील प्रेमकथा, त्यात आलेला राजकीय, धार्मिक संघर्ष प्रभावीपणे मांडण्यात आला होता. सनी देओलचा अभिनय प्रेक्षकांना कमालीचा आवडला होता.
 

*  फिल्म- चक दे इंडिया
अभिनेता- शाहरुख खान
देशभक्ति डायलॉग- मुझे स्टेट्स के नाम ना सुनाई देते हैं..ना दिखाई देते हैं..सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है इंडिया.
रोमँटिक हिरो म्हणून शाहरुखची ओळख आहे. तशी त्याची आजवर झालेली प्रतिमा आहे. मात्र या चित्रपटानं ती मोडित काढली. शाहरुखला फारसं पसंत न करणा-या प्रेक्षकांनीही त्याच्या या चित्रपटातील कामाचं कौतूक केले होते.

*  फिल्म- रंग दे बसंती
अभिनेता- आमिर खान
देशभक्ति डायलॉग- अब भी जिसका खून ना खौला, खून नहीं वो पानी है...जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है।
बॉलीवूडमधील एक ट्रेंड सेटर चित्रपट म्हणून रंग दे बसंती चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल. त्यातील गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. त्याला ए आर रेहमानचे संगीत लाभले होते. देशभक्ती आणि तरुणाई यांच्यातील वेगवेगळ्या मुद्दयांवर दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रेक्षकांना मनापासून आवडला होता.

* फिल्म- बॉर्डर 
अभिनेता-सुनील शेट्टी
देशभक्ति डायलॉग- शायद तुम नहीं जानते..ये धरती शेर भी पैदा करती है, ऐसे शेर जो दूसरों को मिट्टी में मिलाते हैं।
बॉर्डरविषयी काय सांगावे, जेपी दत्ता यांची भव्य कलाकृती म्हणून बॉर्डरचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमध्ये आतापर्यत जे देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाले त्यातील सर्वात लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणून बॉर्डरचे नाव घ्यावे लागेल. भारतीय जवान त्यांचा संघर्ष, त्याचे देशप्रेम, त्याला करावा लागणारा त्याग यासगळ्याचे भावनिक तितकेच वास्तवदर्शी चित्रण बॉर्डरमध्ये केले गेले.

  फिल्म- मां तुझे सलाम
अभिनेता- सनी देओल
देशभक्ति डायलॉग- दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे चीर देंगे।
सनी देओलच्या या चित्रपटातील हा संवाद कमालीचा लोकप्रिय तर झालाच पण त्याला मोठ्या वादालाही सामोरं जावं लागलं होतं. काश्मीर आणि भारत यांच्यातील तणावाची परिस्थिती पाहता त्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केला होता. अशाप्रकारे बॉलीवूडमधील वेगवेगळे चित्रपट आणि त्यातील संवादानं भारतीय प्रेक्षकांच्या मनातील देशभक्तीचा विचार प्रखर केला आहे. 

loading image