प्रसिध्द अभिनेत्री रेवतीचा 14 जणांवर अत्याचाराचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress revathy sampath

प्रसिध्द अभिनेत्री रेवतीचा 14 जणांवर अत्याचाराचा आरोप

मुंबई - मल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिध्द अभिनेत्री रेवती संपत (tollywood actress revathy sampath) सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चेत आली आहे. तिनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. रेवतीनं आपल्यावर 14 जणांनी शाररिक अत्याचार (physical assult) केल्याचे सांगितले आहे. त्यात एका सिद्धिकी नावाच्या अभिनेत्याचाही समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे सध्याच्या घ़डीला टॉलीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगली आहे. त्याचे कारण रेवतीचा मोठा खुलासा हे आहे. (revathy sampath names people who harassed her accuses actor siddique)

रेवतीनं (revathy) आपल्यावर झालेल्या आरोपांची माहिती फेसबूक पोस्टच्या आधारे दिली आहे. त्या पोस्टला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. त्याची खूप चर्चाही झाली आहे. रेवतीला त्यांनी आधार देत तिला आपला पाठींबाही जाहिर केला आहे. आपल्या त्या पोस्टमध्ये तिनं 14 जणांची नावंही सांगितली आहेत. त्यात एक नाव प्रख्यात अभिनेता सिद्धिकीचेही आहे. रेवतीनं जेव्हा ही पोस्ट शेअर केली त्यावेळी तिनं आपल्याला कोणाचीही भीती वाटत नसल्याचे सांगितले आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांची नावे बिनधास्तपणे शेअर करणार असल्याचे सांगितले आहे.

रेवतीच्या या खुलाशानं सर्वांना धक्का दिला आहे. विशेष म्हणजे त्या 14 जणांपैकी एकाचीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे संशय आणखी वाढला आहे. सोशल मीडियावरील युझर्सनं रेवतीला आपला पाठींबा जाहिर करत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच रेवतीच्या प्रकरणाची दखल घेऊन गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.

अभिनेत्रीनं सांगितलं, त्या 14 जणांनी केवळ आपल्यावर शाररिक अत्याचार केला नाही तर आपला मानसिक छळही केला आहे. त्या यादीमध्ये तिनं प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक राजेश यांचेही नाव घेतले आहे. ज्यांनी अनेक नॅशनल अॅवॉर्डही जिंकले आहेत. याबरोबरच डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे नेते नंदू अशोकन यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिका-यांचीही नावं घेतली आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.