#BalaReview : आयुष्मानचा 'बाला' सुपर एन्टरटेनिंग 

#BalaReview : आयुष्मानचा 'बाला' सुपर एन्टरटेनिंग 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुरानाने पुन्हा एकदा तो एक उत्तम कलाकार असल्याचं दाखवून दिलं आहे. याचवर्षी आयुष्मान खुरानाचे 'आर्टिकल 15', 'ड्रीमगर्ल' आणि आता 'बाला' हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामुळे वर्षभर आयुष्मानने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. 'आर्टिकल 15' या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे 'ड्रीमगर्ल' चित्रपटातील आयुष्मानच्या भूमिकेचं कौतुक झालं. आणि आता 'बाला' बनून आयुष्मान प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय.

तरुण वयात केस गळतीमुळे टक्कल पडलेल्या बाला या कानपूरमध्ये राहणारा तरुण या चित्रपटाचा नायक आहे. अकाली केसगळतीमुळे समाजात वावरताना वाटणारा संकोच, टकलेपणामुळे समाजाचं खिल्ली उडवणं, ते खटकणं या सगळ्या गोष्टी विनोदी पद्धतीन उत्तम पद्धतिने मांडण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा चार्मिंग क्यूट बॉय साकारणारा आयुष्मान जेव्हा टक्कल असलेला तरुण साकारतो तेव्हा टकलेपणामुळे झालेला निराश तरुण त्याच्यात दिसतो. मात्र त्यासाठी विविध उपायही तो करतो. मात्र हे उपाय कितपत उपयोगी ठरतात आणि केस गळतीवर उपाय करत असताना कोणकोणते विनोदी प्रसंग येतात हे पाहणं रंजक आहे.

काही प्रसंग आणि संवाद तर खळखळून हसवतात. केस गळतीवर विविध 'नुस्के' जेव्हा बाला अमलात आणतो आणि त्याचे मित्र, त्याचा भाऊ यात त्याला कसे मदत करत असतात हे पाहण्यात चांगलीच धमाल येते. या चित्रपटासाठी आयुष्मानने खरंखुरं टक्कल केलेलं नाही, मात्र उत्तम  मेकअपमुळे ते कुठेही जाणवत नाही. आयुष्मानने आत्तापर्यंत विविध विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, आणि याही चित्रपटात त्यानं कमाल कॉमेडी केली आहे.  

यामी गौतमच्या काबील चित्रपटातील भूमिकेचं कौतुक झालं होतं. आणि यावेळी लखनौची टीक टॉक स्टार तिने साकारली आहे. त्यात नेहमीच्या चित्रपटांतील भूमिकांचा तोच तोचपणा न आणता  त्या भाषेचा लहेजा पकडण्याचा प्रयत्न यामीने केला आहे. तर दुसरीकडे भूमी पेडणेकरचं कॅरेक्टरही पसंत केलं जात आहे. याचं मुख्य कारण म्हणजे काळा वर्ण असलेली तरुणी जिला लहानपणापासूनचं समाजाच्या टोमण्यांना सामोरं जावं लागलय, आणि आता वकिल म्हणून नोकरी करत असताना समाजाची पर्वा न करता बिनधास्तपणे वावारताना तिला दाखवलय. त्यामुळे भूमीचं कॅरेक्टरही भाव खाऊन जात आहे.

याशिवाय पूर्ण सिनेमाभर  सौरभ शुक्ला, जावेद जाफरी,सीमा पाहवा आणि इतर कलाकारांनीही कमाल काम केलेलं पाहायला मिळत आहे. चित्रपटात एक चांगला संदेश विनोदी पद्धतिनं मांडल्यामुळे हा सिनेमा मनोरंजक ठरतो.

Webtitle : review of ayushmans latest bala movie


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com