कासव : एक संवाद स्वत:ला सावरणारा!

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

छायांकन, संगीत, पार्श्वसंगीत, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट यशस्वी झाला आहे. इरावती हर्षे, किशोर कदम, आलोक राजवाडे, मोहन आगाशे यांनी आपल्या कामाचा परीघ ओळखून भूमिका साकारल्या आहेत. इरावती आणि आलोकचं विशेष कौतुक करायला हवं. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवून राजाश्रय मिळवला आहेच. आता त्याला लोकाश्रयही मिळायला हरकत नाही. म्हणूनच ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि अभिनेता अालोक राजवाडे यांनी या लाईव्ह रिव्ह्यूमध्ये भाग घेतला. 

पुणे : गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट ठरलेला कासव हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवल्याने हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली असेल. त्या उत्सुकतेला हा चित्रपट पुरून उरतो. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट संवाद साधण्यास भाग पाडतो. हा संवाद निसर्गाशी आहे. हा संवाद भवताल्याच माणसांशी आहे आणि तो स्वत:चा स्वत: शीही आहे. कथेची नेटकी गुंफण, उत्तम अभिनय, रेखीव छायांकन आदी गोष्टींमुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत 4 चीअर्स. 

रिव्ह्यू #Live कासव.. 

सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर ही जोडी सातत्याने चित्रपट बनवते आहे. लोकांना समजेल, रुचेल अशा भाषेत जगण्याजवळ जाण्याचा प्रयत्न त्यांच्या चित्रपटातून दिसतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या चित्रपटाचा लाईव्ह रिव्हू ई सकाळच्या एफबी पेजवरून झाला. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुकथनकर आणि अभिनेता आलोक राजवाडे यांनी या रिव्हयूमध्ये भाग घेतला. त्यांनी या उपक्रमाचं कौतुकही केलं. अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना आपआपली मतं मांडता येत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं. 

जानकी, नीश, दत्ताभाऊ, बाबल्या, परशा या मोजक्या व्यक्तिरेखांभवती हा चित्रपट फिरतो. जानकी घरी एकटी असते. तिचा नवरा, मुलगा परदेशी आहेत. एकटेपणामुळेच ती अत्यंत निराश झाली आहे. तिच्या मनात आत्महत्या करण्याचे विचारही येत असतात. पण त्यातून शहाणं होत ती डाॅक्टरांची ट्रीटमेंट घेते आहे. तिने आपलं मन इतर कामात गुंतवलं आहे. दत्ताभाऊंसोबत ती काम पाहाते. दत्ताभाऊ समुद्री कासवांच्या प्रजननाची नीट काळजी घेत त्यावर काम करतायत. त्यासाठी कोकणात जात असताना तिला नीश भेटतो. नीशही पुरता वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण असाच भरकटलेला नीश जानकीला भेटतो आणि ती त्याला आपल्या घरी कोकणात आणते. पुढे यांच्या विचारांच्या संघर्षातून, संवादातून कासव पुढे जात राहतो. 

छायांकन, संगीत, पार्श्वसंगीत, संकलन, कलादिग्दर्शन या सर्वच पातळ्यांवर चित्रपट यशस्वी झाला आहे. इरावती हर्षे, किशोर कदम, आलोक राजवाडे, मोहन आगाशे यांनी आपल्या कामाचा परीघ ओळखून भूमिका साकारल्या आहेत. इरावती आणि आलोकचं विशेष कौतुक करायला हवं. या चित्रपटाने सुवर्णकमळ मिळवून राजाश्रय मिळवला आहेच. आता त्याला लोकाश्रयही मिळायला हरकत नाही. म्हणूनच ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. 

 

Web Title: Review live marathi movie Kaasav by soumitra pote esakal news