Review; एकदा पाहावाच असा 'भुज'; अजयची प्रेक्षकांना अनोखी भेट

भारत आणि पाकिस्तानचं india and pakistan ते युध्द तेव्हा मोठं चर्चेत आलं होतं.
bhuj the pride of india
bhuj the pride of india Team esakal
Updated on

भारत आणि पाकिस्तानचं india and pakistan ते युध्द तेव्हा मोठं चर्चेत आलं होतं.दुसरीकडे बांग्लादेशचा मुक्तीसंग्रामाचा लढा तेव्हा ऐन भरात आला होता. ही गोष्ट आहे १९७१ ची. देशभरातील वातावरण त्याप्रसंगी वेगळ्या पद्धतीचं होतं. जिकडे पाहावं तिकडे युद्धाच्या चर्चा होत्या. भुज द प्राईड ऑफ इंडियाचं bhuj the pride of india कथानक या परिस्थितीभोवती फिरणारं आहे. इतर चित्रपटांमध्ये असतो तसा थरार त्यात आहे. हिंसक दृश्येही आहेत. गाणी आहेत. लक्षवेधी संवादही आहेत. दमदार अभिनयही आहे. एवढं असूनही हा चित्रपट काही प्रेक्षकांच्या मनाची म्हणावी अशी पकड घेत नाही. आपल्याकडे यापूर्वी वेगवेगळ्या विषयांवर युद्धपट तयार झाले आहेत. बॉर्डरसारखा चित्रपट आजही प्रेक्षकांना भावतो. गेल्या काही वर्षांपूर्वी आलेला उरी द सर्जिकल स्ट्राईकही प्रचंड लोकप्रिय झाला.

अजय देवगण ajay devgn हा अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांना माहिती आहे. मात्र अनेक गोष्टी आपण एकट्यानेच करायच्या हा त्याचा अट्टाहास चित्रपटाची रंगत कमी करतो. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. हे युध्द भारताची मित्र वाहिनी आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात झालं. त्या युद्धाची सुरुवात ११ भारतीय एअर स्टेशनवर हल्ला करुन झाली. पाकिस्ताननं त्या ह्ल्ल्याचं नाव ऑपरेशन चंगेज खान असं ठेवलं होतं. हे युद्ध ३ ते १६ डिसेंबर १९७१ दरम्यान झालं.

अजयनं या चित्रपटामध्ये एअर फोर्स अधिकारी विजय कर्णिक यांची भूमिका साकारली आहे. भारतीय सेना अकरा वेगवेगळ्या भागांमध्ये युद्ध करत होती. त्यात सर्वाधिक लक्षवेधी लढत होती ती भुजमधील ८ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्ताननं गुजरातमधील भुजच्या रुद्र माता एअर बेसवर हल्ला केला. पाकिस्ताननं १४ दिवस बॉम्बिंग सुरु ठेवलं होतं. तो हल्ला आणि त्या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी दिलेलं प्रत्युत्तर भुजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या एअरबेसचे कमांडर होते स्क्वाड्रन लिडर विजय कुमार कर्णिक. भारतीय सेनेला तेव्हा सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून मदत हवी होती. मात्र त्यांच्याकडेही पुरेशा प्रमाणात जवान नव्हते. यात पुढे काय झालं यासाठी भुजच्या वाट्याला जावं लागेल.

bhuj the pride of india
सोनु सुदनं सांगितली झाडु मारण्याची नवी ट्रीक, सफाई कामगार चक्रावले

चित्रपटामध्ये अजय देवगण शिवाय संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही, शरद केळकर, प्रणिता सुभाष, श्रद्धा कपूर, राणा दग्गुबाती यांच्या भूमिका आहेत. प्रत्येक कलाकारानं आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. दिग्दर्शनही चांगले आहे. युद्धाचे प्रसंग म्हणावे इतके प्रभावी नाहीत. यानिमित्तानं आपल्याकडील ग्राफीक्स वर्क दुबळं असल्याचे दिसून आले आहे. पण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं का होईना भुज - द प्राइड ऑफ इंडिया पाहण्यास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com