esakal | सुशांतच्या मृत्युमुळे रियाच्या बॉलीवूड करिअरला लागला ब्रेक, २०२१ मध्ये होणार का एंट्री?
sakal

बोलून बातमी शोधा

rhea

रिया चक्रवर्ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या 'चेहरे' या सिनेमात दिसणार आहे. मात्र यालाही रियाचा नवीन प्रोजेक्ट म्हणता येणार नाही कारण यावर आधीपासूनंच काम सुरु आहे.

सुशांतच्या मृत्युमुळे रियाच्या बॉलीवूड करिअरला लागला ब्रेक, २०२१ मध्ये होणार का एंट्री?

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेत्री सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला ६ महिन्यांपेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत मात्र अजुनही सुशांतचे चाहते त्याच्यासाठी न्यायाची मागणी करत आहेत. सोशल मिडियावर याबाबतंच ट्रेंडिंग अजुनही सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे कित्येकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्तीला सुरुवातीपासूनंच या प्रकरणात मुख्य आरोपी ठरवलं गेलं. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्तीचा विरोधात एफआयआर दाखल करत तिच्यावर धोका दिल्याचा आरोप लावला होता. मात्र हे प्रकरण जेव्हा सीबीआयकडे पोहोचलं तेव्हा ही केस पूर्णपणे बदलली आणि रियाला ड्रग्सकेसमध्ये दोषी म्हटलं गेलं. 

हे ही वाचा: शिल्पा शेट्टीने चाहत्यांना दिलं नवीन वर्षाचं गिफ्ट, मुलगी समीशाची दाखवली झलक  

रिया चक्रवर्तीला ड्रग्सकेसमध्ये जामीन मिळाला तर आहे मात्र तिचं करिअर चौपट झालंय. ज्या अभिनेत्रीला सोनाली केबल सारख्या सिनेमासाठी ओळखलं जायचं तिच्याकडे आता कोणताच सिनेमा नाहीये. पहिले अशी चर्चा होती की रुमी जाफरी यांच्या सिनेमात ती दिसून येणार आहे. मात्र स्वतः रुमी यांनी याबाबत स्पष्टीकरण देत ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीकडे ना २०२० मध्ये काही काम होतं आणि नाही आता २०२१ मध्ये तिला काम मिळेल अशी अपेक्षा आहे. हा हे मात्र नक्की की तिच्याकडे एक सिनेमा आहे ज्यावर अनेक महिन्यांपासून काम सुरु आहे.

रिया चक्रवर्ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांच्या 'चेहरे' या सिनेमात दिसणार आहे. मात्र यालाही रियाचा नवीन प्रोजेक्ट म्हणता येणार नाही कारण यावर आधीपासूनंच काम सुरु आहे. अशातंच सुशांत केसमुळे रियाचं बॉलीवूड करिअर धोक्यात आलं आहे. निर्माते आता तिच्यासोबत सिनेमा साईन करण्यासाठी कचरत आहेत. तर दुसरीकडे रिया देखील स्वतःला लाईमलाईटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता २०२१ मध्ये रिया चक्रवर्ती मोठ्या पडद्यावर पुन्हा एंट्र करणार का हा मोठा प्रश्न आहे.  सुशांत प्रकरणासाठी रियाला अजुनपर्यंत सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात देखील खूप चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.   

rhea chakraborty bollywood career after sushant singh rajput death no new films  

loading image