
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात आता रिया चक्रवर्ती तर्फे एक स्टेटमेंट जाहीर केलं आहे. रियाच्या वकिलांचं म्हणणं आहे रिया सीबीआय तपासात सहकार्य करेल
रिया चक्रवर्तीने बिहारकडून केस मुंबई पोलिसांकडे सोपवण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या प्रकरणात तपास कोण करणार यावर आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. सीबीआयच्या हातात तपास गेल्यानंतर रियाचे वकिल मानशिंदे यांचं म्हणणं आहे, रिया सीबीआय समोर हजर होत तपासाचा सामना करेल जसा तिने मुंबई पोलिस आणि ईडीच्या तपासात केला होता. रियाचं म्हणणं आहे की 'कोणीही तपास करा मात्र सत्य बदलणार नाही.'
सुशांत सिंह राजपूतचा मृत्यु होऊन २ महिन्यांपेक्षा जास्त दिवस होऊन गेले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आल्याची चर्चा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील ही गोष्ट मान्य केली आहे. सुशांतचं कुटुंब सीबीआय चौकशीची मागणी करत होते. बिहार सरकारच्या विनंतीवर केंद्र सरकारने तपासाची परवानगी दिली होती. तर यातंच महाराष्ट्र सरकारचं म्हणणं होतं की 'मुंबई पोलिस सक्षम आहेत. सीबीआयची गरज नाही तसंच यात बिहार सरकारला केस दाखल करण्याचा अधिकार नाही.' मात्र यावरही सुप्रीम कोर्टाने निर्णय देत सुशांतचं कुटूंब आणि बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटलं की सत्य समोर येणं गरजेचं आहे. रिया चक्रवर्तीला देखील सीबीआय तपास हवा होता. रियाने याआधी सोशल मिडियावर सुशांत प्रकरणात सीबीआय तपास व्हावा असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांना देखील टॅग केलं होतं.
rhea chakraborty lawyer satish maneshinde release statement that she will cooperate in cbi probe
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.