esakal | सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने अमित शाह यांच्याकडे केली सीबीआय तपासाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

rhea chakraborty amit shah

सुशांतच्या कुटुंबाकडून किंवा त्याच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीकडून सीबीआय तपासाची मागणी झाली नव्हती मात्र आता या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे. 

सुशांत आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने अमित शाह यांच्याकडे केली सीबीआय तपासाची मागणी

sakal_logo
By
दिपालीराणे-म्हात्रे, प्रतिनिधी

मुंबई-  अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सोशल मिडियावर त्याच्यासाठी त्याचे चाहते दिवसरात्र त्याला न्याय मिळावा यासाठी लढत आहेत. इतंकच नाही तर चाहत्यांसोबतंच अनेक सेलिब्रिटी देखील त्याच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी सीबीआय तपासाची मागणी करत आहे. इतकंच नाही काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील सीबीआय तपासासाठी मोदींपर्यंत चिठ्ठी पोहचवण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र सुशांतच्या कुटुंबाकडून किंवा त्याच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीकडून सीबीआय तपासाची मागणी झाली नव्हती मात्र आता या प्रकरणात वेगळं वळण आलं आहे. 

हे ही वाचा: धक्कादायक: सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला येत आहेत बलात्काराच्या धमक्या..

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने आता अमित शाह यांच्याकडे सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केलीये. सुशांतच्या मृत्युनंतर शेखर सुमन, रुपा गांगुली, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासोबत अनेकांचं असं म्हणणं आहे की सुशांत आत्महत्या करु शकत नाही. सोशल मिडियावर अनेक लोकांवर आरोप केले जात आहेत. इतकंच नाही तर गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला देखील दोषी मानत तिला ट्रोल करण्यात आलं. आता खुद्द रियानेच सीबीआय तपासाची मागणी केली आहे. 

रियाने इंस्टग्रामवर सुशांतचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिलंय, 'अमित शाह सर मी रिया चक्रवर्ती सुशांतची गर्लफ्रेंड. त्याला गेल्यावर १ महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. मात्र मी त्याला न्याय मिळावा यासाठी तुमच्याकडे हात जोडून प्रार्थना करते की या प्रकरणात सीबीआय तपास सुरु करावा. मला केवळ हे जाणून घ्यायचं आहे की त्याला असं कोणता दबाव होता की त्याने एवढं मोठं पाऊल उचललं.'  

rhea chakraborty requests amit shah for cbi enquiry in sushant death case  
 

loading image