सुशांतच्या मृत्युनंतर पाऊण तासापर्यंत शवगृहात होती रिया?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 21 August 2020

सुशांतचं जिथे पोस्टमार्टम करण्यात आलं होतं त्या मुंबईतील कूपर हॉस्पिटलचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणं घेताना दिसतंय. आता सुशांत प्रकरणाशी संबंधित ३ महत्वाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासात हे व्हिडिओ खूप महत्वाचे पुरावे म्हणून सिद्ध होऊ शकतात. सुशांतचं जिथे पोस्टमार्टम करण्यात आलं होतं त्या मुंबईतील कूपर हॉस्पिटलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांतचा गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसतेय 

हे ही वाचा:  रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचं व्हॉट्सअप चॅट लीक, सुशांतपासून लांब झाल्यावर रिया होती खुश  

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कूपर हॉस्पिटलचं व्हिडिओ फुटेज मिळालं आहे. यामध्ये रिया चक्रवर्ती कूपर हॉस्पिटलमध्ये जवळपास ४५ मिनिटांनंतर बाहेर येताना दिसतेय. तसं पाहायला गेलं तर रियाचं सुशांतसोबत कायदेशीर रित्या कोणतंच नातं नव्हतं. त्यामुळे तिला परवानगी कशी मिळाली? यावर आता प्रश्नचिन्ह आहे.

यासोबंतच आणखी एका व्हिडिओमध्ये निर्माता संदीप सिंह सुशांतच्या घरी असताना २ एँबुलेंस येतात. तिस-या व्हिडिओमध्ये सुशांतचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी नेला जात असताना संदीप सिंह मुंबई पोलिसांना थम्स अप साईन देताना दिसतोय. 

निर्माता संदीप सिंहने आधीच सांगितलं होतं की तो कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांतचे आयडी कार्ड्स घेऊन उभा होता. तर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दावा केला आहे की हे प्रोफेशनल हत्या करणारे आहेत. तसंच याचे धागेदोरे दुबईतील आहेत.   

rhea chakraborty was at cooper hopitals mortuary for 45 mins after  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty was at cooper hopitals mortuary for 45 mins after