नवरी नटली : रिचा चड्ढा विमानतळावर दिसली लाल पोशाखात; लग्नबंधनात अडकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Richa Chadha Latest News

नवरी नटली : रिचा चड्ढा विमानतळावर दिसली लाल पोशाखात; लग्नबंधनात अडकणार

Richa Chadha Latest News रिचा चड्ढा आणि अली फजल हे लग्नबंधनात अडकणार आहे. दिल्लीत विवाहपूर्व सोहळा पार पडला. अगदी मेहेंदीपासून संगीतापर्यंत सर्व कार्यक्रम पार पाडले. त्यांचे फोटही व्हायरल झाले. आता दोघेही लग्नासाठी मुंबईत परतले आहे. लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती असणार आहे.

रिचा चड्ढा विमानतळावर लाल कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. ती इतकी सुंदर दिसत होती की नव वधूची चमक चेहऱ्यावर दिसत होती. रिचाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. फुक्रेच्या अंबरसारिया आणि रांझा रांझा या हिट गाण्यांवर दोघांनी डान्स केला. काही दिवसांपूर्वी रिचाने इंस्टाग्रामवर व्हॉईस नोट शेअर करून लग्नाची घोषणा केली होती.

हेही वाचा: Murali Mohapatra : स्टेजवर गाणी गाताना गायक मुरली महापात्रा यांचा मृत्यू

रिचा आणि अली यांची पहिली भेट फुक्रेच्या सेटवर झाली होती. तेव्हापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. फुक्रे ३ मध्ये ते एकत्र काम करणार आहेत. जो लग्नानंतरचा त्यांचा पहिला चित्रपट असेल.