Richa Chadha : 'मेहंदी लगा के रखना...' रिचाच्या हातावर अलीचं नाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Richa Chadha

Richa Chadha : 'मेहंदी लगा के रखना...' रिचाच्या हातावर अलीचं नाव

Richa-Ali Fazal Marriage : ज्यांच्या लग्नाची चाहत्यांना गेल्या अनेक दिवसांपासून इच्छा होती ती आता त्यांना पूर्ण होत असताना दिसणार आहे. प्रसिध्द अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अभिनेता अली फजल हे पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर आता रिचाच्या मेहंदीचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अली फझल आणि रिचा हे एकमेकांना गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ डेट करत आहेत.

रिचानं यापूर्वी शेयर केलेल्या पोस्टमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन मी आणि फझल लग्नाचा विचार करत आहोत. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आमचे लग्न हे लांबणीवर पडल्याचे दिसून आले. कोरोनाची दोन वर्षे आणि त्यानंतर एकमेकांचे प्रोजेक्ट्स यामुळे पुन्हा लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली होती.

रिचानं सोशल मीडियावर तिच्या मेहंदीचे फोटो शेयर केले असून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. फायनली तुम्ही लग्नाच्या बेडीत अडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तिनं इंस्टाच्या स्टोरीवर मेहंदीचे फोटो शेयर केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला ते विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Nikki Tamboli : निक्की तांबोळीची डीप नेक ड्रेसमधील स्टाइल पाहण्यासारखी

रिच्याच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. तिच्या मेहंदीचा इव्हेंट आता व्हायरल झाला आहे. दिल्लीतील तिच्या मैत्रीणीच्या घरी रिचाची मेहंदी पार पडली आहे. हे तेच घर आहे जिथे रिचा नेहमी अभ्यासाला जात असे. रिचाच्या हातावर वेगळ्या स्टाईलमधील मेहंदी असून त्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Radika Apte: राधिकाची मांजर ठरवते कुणासोबत जायचं 'डेट'ला!