'बलात्कारी संस्कृतीची लाज वाटते असे म्हण,मालिकेला का नावं ठेवतो'

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 26 November 2020

जे आहे त्याचा स्वीकार करुन ते बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. टीकात्मक सूर आळवण्यापेक्षा अशाप्रकारची भूमिका जास्त गरजेची आहे. असेही रिचाने यावेळी सांगितले. 

मुंबई - एमी पुरस्कारावर आपलं नाव कोरणारी पहिली भारतीय मालिका म्हणून 'दिल्ली क्राईम' ने मान मिळवला. यानिमित्ताने चाहत्यांनी त्या मालिकेचे कलाकार, निर्माते यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे काहींनी या मालिकेला नावे ठेवण्यास सुरुवात केली आहे. बलात्कार दाखविणा-या अशाप्रकारच्या मालिकांमधुन देशाची बदनामी होत असल्याची टीका काही नेटक-यांनी केली आहे. यावर अभिनेत्री रिचा चढ्ढाने त्या नेटक-यांना सुनावले आहे.

जगात मानाचा समजला जाणारा एमी पुरस्कार यावर्षी दिल्ली क्राईम या मालिकेला मिळाला. त्यावर सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षावही झाला. कौतूक वाट्याला आले असतानाही अनेकांनी त्या मालिकेला नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारची मालिका ही देशासाठी आदर्शवत कशी असू शकते असा प्रश्न नेटक-यांनी केला आहे, यावर रिचाने त्या नेटक-यांना खणखणीत उत्तर दिले आहे. ती म्हणाली, या मालिकेला पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांच्या पोटात दुखले आहे त्यांनी जरा विचार करण्याची गरज आहे.

दिल्ली क्राईम ही मालिका 2012 मध्ये दिल्लीत झालेल्या गँग रेपवर आधारित आहे.  त्या मालिकेला बेस्ट ड्रामा या विभागातून पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर काही नेटक-यांनी या मालिकेला ट्रोल करण्यास सुरुवात केली यावर भडकेलेल्या रिचाने त्या नेटक-यांची बोलती बंद केली आहे.  त्या नेटक-याने लिहिले होते, गुन्हेगारी वाढत चाललेल्या दिल्लीचे कौतूक कशासाठी चालले आहे हे काही कळाले नाही. ही देशासाठी लज्जास्पद अशी गोष्ट आहे. दिल्लीतील वाढती गुन्हेगारी ही अभिनंदास्पद कशी असू शकते, असा प्रश्न यावेळी त्या नेटक-याने केला होता.

त्याच्या प्रश्नाला तितक्याच परखडपणे उत्तर देताना रिचा म्हणाली,  मुळात देशात बलात्कार होतात त्यामागील कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. तसेच देशातील वाढत्या गुन्हेगारीचा दर कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. ज्या कुणाला याप्रकाराची लाज वाटत आहे त्यांनी पहिल्यांदा हे बलात्काराची संस्कृती बदलण्याची गरज आहे. ते दाखविणा-या मालिकांची नाही. आणि तसेही समाजात जे काही घडते ते वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येत असते. 
तुम्ही जे काही घडते आहे त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी माध्यमं काम करतात.

हे ही वाचा: भाग्यश्रीच्या मुलासोबत सन्या मल्होत्रा करतेय लग्न?      

जे आहे त्याचा स्वीकार करुन ते बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. टीकात्मक सूर आळवण्यापेक्षा अशाप्रकारची भूमिका जास्त गरजेची आहे. असेही रिचाने यावेळी सांगितले. बलात्कार करणा-या संस्कृतीची लाज वाटते असे म्हण ना. त्या मालिकेला कशाला नावे ठेवतो अशाप्रकारच्या शब्दांत रिचानं त्या नेटक-याची कानउघाडणी केली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Richa Chadha defends Delhi Crimes Emmy win after Twitter user