Kantara 2: ऋषभ शेट्टीने सुरू केले 'कंतारा 2'चे काम, शूटिंगपासून रिलीजपर्यंतची माहिती आली समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishab Shetty

Kantara 2: ऋषभ शेट्टीने सुरू केले 'कंतारा 2'चे काम, शूटिंगपासून रिलीजपर्यंतची माहिती आली समोर

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांतारा हा चित्रपट 2022 चा ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या चित्रपटांना मागे टाकले. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, बातमी आली आहे की ऋषभ शेट्टीने दुसऱ्या भागाची स्क्रिप्ट लिहिण्यास सुरुवात केली आहे, जो सिक्वेल नसून प्रीक्वल असेल आणि जर सर्व काही ठीक झाले तर चित्रपटाचे शूटिंग जूनमध्ये सुरू होईल.

वृत्तानुसार, होंबळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरंगादुर यांनी सांगितले की, ग्रीमन, देवता आणि राजा यांच्यातील नाते 'कांतारा 2' मध्ये दाखवले जाईल. राजाने देवतेशी करार केला होता की तो गावकऱ्यांचे आणि त्यांच्या जमिनीचे रक्षण करेल पण नंतर परिस्थिती बदलली.

विजयने असेही सांगितले की चित्रपटाच्या शूटिंगला पावसाळ्याची गरज असल्याने जूनमध्ये शूटिंग सुरू करण्याची योजना आखली आहे आणि पुढील वर्षी एप्रिल किंवा मेमध्ये हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होईल. यावेळी ऋषभ शेट्टी कर्नाटकातील किनारी भागातील जंगलात गेले असून तेथे ते लोककथा अधिक जाणून घेण्यासाठी दोन महिने रेकी करणार आहेत.

'कंतारा 2' चे बजेट वाढवण्यात आले आहे, पण चित्रपटाची स्टाईल, नरेशन आणि सिनेमॅटोग्राफी मागील चित्रपटाप्रमाणेच राहील, असेही विजयने सांगितले. चित्रपटात आणखी कलाकार जोडले जात आहेत आणि ते देखील मोठे नाव असू शकतात.

हेही वाचा: Rashmika Mandanna: अखेर रश्मिका नमली! म्हणाली, "रक्षित अन् ऋषभ शेट्टीनी मला मार्ग.."

विशेष म्हणजे, ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' हा चित्रपट अवघ्या 16 कोटींमध्ये बनला होता आणि त्याने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. सुरुवातीला हा चित्रपट कन्नडमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु लोकप्रियता मिळाल्यानंतर तो डब करून तामिळ, मल्याळम, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले आहे.