esakal | Video: रितेश-जेनेलियाचा रोमँटिक अंदाज तुम्ही एकदा बघाच!
sakal

बोलून बातमी शोधा

Riteish-Genelia

रितेश आणि जेनेलिया यांनी 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. आणि तेव्हापासूनच त्यांचे अफेअर सुरू होते.

Video: रितेश-जेनेलियाचा रोमँटिक अंदाज तुम्ही एकदा बघाच!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा-देशमुख ही जोडी शाहरुख-गौरी खान इतकीच फेमस आहे. कपल कसे असावे? असं विचारलं तर अनेकजण या जोडीचं उदाहरण देतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'कपल गोल्स'च्या बाबतीत रितेश-जेनेलिया हे प्रचंड जागरूक असल्याचे त्यांच्या सोशल मीडियातील पोस्टमधून दिसून येते. हे दोघेही सोशल मीडियावर कमालीचे अॅक्टिव्ह आहेत. एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ ते अधूनमधून शेअर करतात.

असाच एक रोमँटिक व्हिडिओ दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून त्याची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाच्या गळ्यात रेड कलरची टाय बांधत असल्याचे दिसत आहे. ख्रिसमसच्या दिवशी जेनेलिया तयारी करत असताना तिला टाय बांधण्यात रितेश तिची मदत करत आहे. 

- Video : विश्वास नांगरे-पाटील यांचा 'बाला डान्स' पाहिला का?

या व्हिडिओमध्ये जेनेलियाचा मूड कमालीचा फ्रेश दिसत आहे. तर रितेश नुकताच आंघोळ करून आल्याचे दिसत आहे. आणि टाय बांधण्यात तो गुंग झाला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना जेनेलिया म्हणते की, 'इट्स नेव्हर टू लेट टू टाय अ नॉट, ऑल आय वॉन्ट फॉर ख्रिसमस इज यू'. तर 'लेडी बॉस, मेरी ख्रिसमस' असं कॅप्शन रितेशने दिलं आहे. 

- ‘भाईजान’ने पनवेलमधील बर्थडे पार्टी केली कॅन्सल; कारण...

रितेश आणि जेनेलिया यांनी 'तुझे मेरी कसम' या चित्रपटात पहिल्यांदा काम केलं होतं. आणि तेव्हापासूनच त्यांचे अफेअर सुरू होते. 10 वर्षांनंतर 2012 मध्ये ही जोडी लग्नबेडीत अडकली. ख्रिश्चन आणि मराठी पद्धतीने त्यांनी लग्न केले. त्यामुळे देशमुख कुटुंबीय प्रत्येक सण त्यांच्या घरी तेवढ्याच उत्साहात साजरे करतात.  

- राजकुमार रावची गर्ल फ्रेंड आहे 'Too Hot'

सध्या रितेश त्याच्या आगामी 'बागी-3' सिनेमामध्ये व्यस्त आहे. यामध्ये तो टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मरजांवा' या चित्रपटातील रितेशच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. तसेच तो अक्षयकुमार, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, क्रिती सेनॉन आणि पूजा हेगडे यांच्यासोबत 'हाऊसफुल-4' मध्ये झळकला होता.