रितेश देशमुख-जेनेलियामध्ये बिनसलं? 

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. पण सध्या या दाेघांमध्ये काहीतरी बिनसंल असल्याची साेशल मिडियावर चर्चा आहे.

मुंबई : बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा हे बॉलिवूडचे क्यूट कपल आहे. पण सध्या या दाेघांमध्ये काहीतरी बिनसंल असल्याची साेशल मिडियावर चर्चा आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Sunday #valentines #pensivemood #whiteandblueanitadongre #grassroot

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

दरम्यान, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही बॉलिवूडचे क्यूट कपलपैकी एक आहेत. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. दरम्यान रितेशने रविवारी त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत जेनेलियाला टॅग केलं. या पोस्टमधील फोटोत लिहिलं होतं की, 'प्रत्येक रागावलेल्या महिलेच्या मागे एक पुरुष असतो ज्याला अजिबात माहीत नसतं की त्याची चूक काय झाली.'

या फोटोत एक रागावलेली महिला दिसते तर तिच्या मागे उभा असलेल्या पुरुषाच्या चेहऱ्यावर ती नक्की का रागावली आहे हेच कळत नाही असे भाव आहेत. रितेशच्या पोस्टवर जेनेलियानेही परत रितेशला टॅग करत म्हटलं की, 'मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो.'

दोघांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही नेटिझन्सने लिहिले की, गृहक्लेश आता ऑनलाइन झाला आहे तर अजून एका युझरने ही तर प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे अशी कमेन्ट केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Valentine's Day

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad) on

रितेश देशमुखच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच तो मिलाप जावेरी यांच्या मरजावां सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात त्याच्यासोबत एक विलन सिनेमातील सह-कलाकार सिद्धार्थ मल्होत्रा असणार आहे. याशिवाय हाउसफुल्ल- 4 मध्ये तो अक्षय कुमार, बॉबी देओल, क्रिती सॅनन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत कॉमेडीचा तडका लावताना दिसेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riteish deshmukh genelia deshmukh fight on twitter