रितेश देशमुखने सांगतलं नॉनव्हेज सोडण्याचं कारण, वडिलांच्या आठवणीत भावूक झाला रितेश

riteish
riteish

मुंबई-अमिताभ बच्चनचा कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती' सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये प्रत्येक आठवड्याला  कर्मवीर एपिसोड ठेवला जातो. ज्यामध्ये समाजसेवीशी संबंधित लोक येतात आणि त्याच स्पर्धकांच्या मदतीसाठी येतात सेलिब्रिटी. याआठवड्याच्या कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये मोहन फाऊंडेशनशी संबंधित डॉक्टर सुनील श्रॉफ आले होते. डॉ. सुनील यांच्यासोबत रितेश देशमुख देखील पोहोचला.

कर्मवीर स्पेशल एपिसोडमध्ये रितेश देशमुखने त्याच्या कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर चर्चा केली. रितेशने वडिल विलासराव देशमुख यांच्या आठवणीत एक भावूक किस्सा शेअर केला. सोबतचं त्याने अंगदान करण्याची इच्छा सांगितली आणि शरिर फिट कसं ठेवता येईल याबाबत सांगितलं. रितेशने या शो दरम्यान सांगितलं की वडिल विलासराव देशमुख यांना कोणत्या तरी अवयवाची कमतरता भासल्याने त्यांना वाचवलं गेलं नाही.

रितेश एका प्रश्नाच्या संदर्भात बोलताना सांगितलं की त्याने नॉनव्हेज खाणं देखील सोडलं आहे. जेव्हा अमिताभ यांनी कारण विचारलं तेव्हा तो म्हणाला 'जेव्हा आम्ही ठरवलं की आम्ही अवयव दान करणार आहोत तेव्हा मी नॉनव्हेज खाणं आणि कॉफी हे सगळं बंद केलं जेणेकरुन शरिराचं स्वास्थ्य राखु शकु आणि अंगदान करु शकु.' रितेशने अमिताभ आणि सुनील श्रॉफ यांच खूप कौतुक केलं. रितेशने सुनील श्रॉफला या शोमध्ये २५ लाख रुपये जिंकण्यासाठी मदत केली. मोहन फाऊंडेशनच्या माध्यमातून ११ हजार ६०० लोकांना अंगदानमुळे आयुष्य मिळालं आहे.   

riteish deshmukh have plan to donate organs says on the sets of kbc   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com