esakal | 'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव
sakal

बोलून बातमी शोधा

genelia dsouza

'माझ्या बायकोचे नाव जेनेलिया नाही, तर..'; रितेश देशमुखने सांगितलं खरं नाव

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता रितेश देशमुख Riteish Deshmukh आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख Genelia D'souza यांना पाहिलं की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात यावर पूर्ण विश्वास बसतो. महाराष्ट्राचा लेक आणि सुनबाई म्हणून ही जोडी ओळखली जाते. २०१२ मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. जिनिलियाने नुकताच तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त रितेशने पत्नीसोबतचा खास व्हिडीओ पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर रितेशने जिनिलियाच्या नावाबद्दल एक ट्विट केलं. जिनिलियाचा नावाचा उच्चार अनेकदा चुकीचा केला जातो, अनेक ठिकाणी तिचं मराठीत नाव चुकीच्या पद्धतीने लिहितात. तिच्या नावाचा संभ्रम टाळण्यासाठी रितेशने मराठीत तिचं खरं नाव सांगितलं आहे. 'माझ्या बायकोचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही', असं ट्विट रितेशने केलं आहे.

रितेशच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. काहींनी जिनिलियाच्या नाव गुगल ट्रान्सलेटरमध्ये टाकून त्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. मराठीत उच्चार वेगळा असला तरी इंग्रजीत स्पेलिंग एकच असते, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तर काहींनी भन्नाट मीम्सही पोस्ट केले आहेत. 'नावात काय ठेवलंय', असंही एकाने लिहिलंय.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीची मालदीवमध्ये पतीसोबत धमाल

रितेश-जिनिलियाची लव्ह-स्टोरी

'तुझे मेरी कसम' या चित्रपटात रितेश-जिनिलियाने पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिल्यांदा भेट झाली. मात्र पहिल्या भेटीतील जिनिलियाचं वागणं रितेशला पटलं नव्हतं. रितेशने स्वत:हून मैत्रीचा हात तिच्यापुढे केला होता, मात्र जिनिलियाने त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर शूटिंगदरम्यान जसजसं दोघं एकमेकांना ओळखू लागले, तसतसं त्यांच्यात मैत्री होऊ लागली. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर कधी झालं हे त्या दोघांनाही समजलं नाही. त्यावेळी रितेश २४ वर्षांचा तर जिनिलिया १६ वर्षांची होती.

loading image
go to top