Riteish Deshmukh: 'वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण...', रितेशच्या पोस्टनं वेधलं लक्ष

रितेश देशमुखनं दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताला आपल्या 'वेड' सिनेमाचं पोस्टर अन् रीलिजची तारीख जाहीर केली आहे.
RIteish Deshmukh 'Ved' Movie post And relaese date declared on diwali padwa
RIteish Deshmukh 'Ved' Movie post And relaese date declared on diwali padwaInstagram

Riteish Deshmukh: आज दिवाळी पाडवा चे औचित्य साधून. अभिनेता आणि आता दिग्दर्शनाची भूमिका साकारणारा रितेश देशमुखनं त्याचा आगामी चित्रपट ' वेड ' च्या पोस्टर चे अनावरण केले. पोस्टरसोबत त्यानं केलेली पोस्ट अन् पोस्टला दिलेलं कॅप्शन सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पोस्टरसोबतच रितेशनं सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज होतोय हे देखील जाहीर केलं आहे. (RIteish Deshmukh 'Ved' Movie post And relaese date declared on diwali padwa)

RIteish Deshmukh 'Ved' Movie post And relaese date declared on diwali padwa
Janhvi Kapoor: बोनी कपूरमुळे श्रीदेवीचा जीव होता धोक्यात..,जान्हवीनं सांगितलं शॉकिंग सीक्रेट

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख करणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे या चित्रपटा द्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे .

या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी ,तेलगू ,तमिळ ,कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे तसेच अभिनेत्री जिया शंकर या चित्रपटात भूमिका साकारत आहेत . आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहे . आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर केली.

रितेश आणि जेनेलिया तसंही ऑनस्क्रीन आणि ऑफस्कीन क्यूट कपल म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यात अनेक वर्षांनी दोघं एकत्र, तेही मराठी सिनेमाच्या माध्यमातून सिल्वहर स्क्रीनवर काम करताना दिसणार यानं त्यांचे चाहते भलतेच उत्सुक झालेयत. रितेशनं शेअर केलेल्या पोस्टरनं ही उत्सुकता अधिक वाढवली आहे, आता 'वेड' सिनेमाच्या भेटीचं वेड चाहत्यांना लागलं असं म्हटलं तर वावग ठरू नये. रितेशच्या 'लय भारी' सिनेमानं मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची गोडी लावलीच होती. त्यात जेनेलियाची झलकही दिसली होती. त्यामुळे मराठीत रितेश-जेनेलिया एकत्र दिसावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. रितेशनं आपल्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करत अन् दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करत,रिलीजची तारीख जाहीर एकाप्रकारे त्यांना दिवाळी गिफ्टच दिलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com