रितेश म्हणाला, म्हणून माझा इगो झाला हर्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 20 October 2020

2012मध्ये लग्न झालेल्या रितेश आणि जेनेलिने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये कपिलने रितेशला लग्नाविषयी एक खास प्रश्न विचारला आहे.

मुंबई - प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याचा आणि पत्नी जेनेलिया डिसुझा यांचा कपिलच्या शो चा एक व्ह्डिीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने एक किस्सा शेयर केला असून त्या प्रसंगामुळे आपला इगो हर्ट झाल्याचे म्हटले आहे. सेलिब्रेटी किक्रेट लिगचा सामना असताना अशी घटना घडली होती. 

2012मध्ये लग्न झालेल्या रितेश आणि जेनेलिने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून त्यामध्ये कपिलने रितेशला लग्नाविषयी एक खास प्रश्न विचारला आहे. रितेशने सांगितले, आम्ही सेलिब्रेटी किक्रेट लिगचा सामना खेळत होतो. त्यावेळी दक्षिणेच्या संघातील दोन खेळांडूमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. ती अशी की, हा जेनेलियाचा पती आहे. ते मी ऐकले आणि माझा इगो हर्ट झाला. ही गोष्ट मी जेनेलियाला सांगितली. त्याठिकाणी मी जेनेलिय़ाचा पती होतो तर महाराष्ट्रात जेनेलिय़ा रितेशली पत्नी आहे. असे बोलले जाते. अशी मिश्किल टिप्पणी रितेशने यावेळी केली.

एका राजकीय कुटुंबातील असणा-या रितेशला लग्नात तुम्ही सप्तपदी घेतली की शपथ घेतली असा गमतीशीर प्रश्न कपिलने या दोघांना विचारला. तेव्हा आपल्या विनोदबुद्धीसाठी ओळखला जाणारा रितेशनेही त्याला भन्नाट उत्तर दिलं. “शपथ घेतली की सरकार फक्त पाच वर्षांसाठी असतं. पाच वर्षांनंतर सरकार बदलतं”, असं उत्तर देताच सेटवर एकच हशा पिकला. येत्या काळात जेनेलियाला घेऊन आपण एक चित्रपट करणार असल्याचे रितेशने सांगितले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riteish Deshmukhs ego was hurt after he was called Genelias husband