रितेश जेनिलीयाचा "माऊली' 

वृत्तसंस्था
बुधवार, 2 मे 2018

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख नुकतेच त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाच्या कामाला लागले आहेत. जेनेलियासाठी हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्‍ट आहे, असे तिने ट्विटरवरून सांगितले आहे. रितेशने "लय भारी' या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले होते. त्या चित्रपटाला खूप यश मिळाले होते. त्यानंतर आता "माऊली' या चित्रपटाच्या निमित्ताने जेनेलिया आणि रितेश देशमुख प्रॉडक्‍शन आता दुसऱ्यांदा मराठीचा झेंडा फडकवणार आहेत. "माऊली' हा एक ऍक्‍शन ड्रामा असणार आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू झाले आहे. रितेश या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय.

जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख नुकतेच त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाच्या कामाला लागले आहेत. जेनेलियासाठी हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्‍ट आहे, असे तिने ट्विटरवरून सांगितले आहे. रितेशने "लय भारी' या चित्रपटातून मराठीत पदार्पण केले होते. त्या चित्रपटाला खूप यश मिळाले होते. त्यानंतर आता "माऊली' या चित्रपटाच्या निमित्ताने जेनेलिया आणि रितेश देशमुख प्रॉडक्‍शन आता दुसऱ्यांदा मराठीचा झेंडा फडकवणार आहेत. "माऊली' हा एक ऍक्‍शन ड्रामा असणार आहे आणि या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील फिल्म सिटीमध्ये सुरू झाले आहे. रितेश या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेविषयी तो म्हणतो, " एक अभिनेता म्हणून मला वेगवेगळ्या विषयांमध्ये प्रयोग करायचे होते. गेल्या काही वर्षात मला तशी संधी मिळत गेली. "लय भारी' या चित्रपटातून मला ऍक्‍शन ड्रामाही जमू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला. जेव्हा मी "माऊली'ची पटकथा वाचली तेव्हा मला वाटले की मी दुसऱ्या मराठी चित्रपटासाठी तयार आहे.' जेनेलियानेही तिची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता सोशल मीडियावरून व्यक्त केली आहे. "माऊली' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार करणार आहे; तर या चित्रपटाची कथा क्षितिज पटवर्धन याने लिहिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riteish Genilia's movie "mauli"