
नुकताच रितेशने सोशल मिडीयावर रोमँटीक व्हिडिओ शेअर केला आहे..रितेशचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे..
मुंबई- कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे...या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे..लॉकडाऊनमुळे कंटाळलेले लोक वेळ घालवण्यासाठी सोशल मिडीयाचा जास्त वापर करत आहेत...यात सेलिब्रिटीही मागे नाहीत..नेहमीच शूटींगमध्ये व्यस्त असणारे सेलिब्रिटी आता घरात राहुन वेळ घालवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत..या तणावपूर्ण वातावरणात काही सेलिब्रिटी असे आहेत जे लोकांचं मनोरंजन करुन वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत आहेत...अशीच एक सेलिब्रिटी जोडी म्हणजे रितेश-जेनेलिया...हे दोघंही सध्या टिकटॉकवर त्यांचे मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांना हसवत असतात..मात्र आता यांचा एक रोमँटीक व्हिडिओ समोर आला आहे..
हे ही वाचा: हा पहा सनी लिओनीचा 'चपाती डान्स'..व्हिडिओ होतोय व्हायरल
नुकताच रितेशने सोशल मिडीयावर रोमँटीक व्हिडिओ शेअर केला आहे..रितेशचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे..या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया १९९१ मधील सुपरहिट सिनेमा 'साजन'मधील 'मेरा दिल भी कितना पागल है' गाण्यावर ऍक्ट करताना दिसत आहेत..'साजन' सिनेमात माधुरी दिक्षित, संजय दत्त आणि सलमान खान मुख्य भूमिकेत होते..रितेशने कुमार सानू-अलका याग्निकने गायलेल्या मुळ गाण्याव्यतिरिक्त आतिफ असलमने गायलेल्या रिमिक्स गाण्यावर ऍक्ट केलं आहे..रितेश-जेनेलियाचा ऑनस्क्रीन रोमान्स त्यांच्या ख-या आयुष्यातील नातं दर्शवतो..
हा व्हिडिओ शेअर करताना रितेश लिहीतो, 'लॉकडाऊनमधील प्रेम..साजनमधील माझं आवडतं गाणं..' असं म्हणत रितेशने हा व्हिडिओ माधुरी आणि संजय दत्तला टॅग देखील केला आहे..रितेशचा हा व्हिडिओ आत्तपर्यंत १० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे..तर या व्हिडिओवर रितेशचे चाहते प्रतिक्रिया देखील देत आहेत..'बेस्ट कपल', 'लव्हली कपल', 'फेवरेट जोडी' यांसारख्या प्रतिक्रियांसोबतंच 'बॉलीवूडची सगळ्यात मस्त जोडींपैकी एक' अशा देखील कमेंट पाहायला मिळतात..
काही दिवसांपूर्वी रितेशने भांडी घासत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता..या व्हिडिओ काही क्षणातंच व्हायरल झाला होता...या व्हिडिओमध्ये जेनेलिया हातात लाटणं घेऊन रितेशला भांडी घासायला लावत असल्याचं दिसून आलं होतं.
ritesh deshmukh and genelia d souzas tiktok romance going viral