RJ मलिष्का करतेय रस्तांच्या खड्ड्यांची पूजा (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवर गाणं करत; मुंबई महानगरपालिकेला आरसा दाखविण्यासाठी पुन्हा एकदा आर.जे. मलिष्का व्हायरल झाली आहे.

मुंबई : रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांवर गाणं करत; मुंबई महानगरपालिकेला आरसा दाखविण्यासाठी पुन्हा एकदा आर.जे. मलिष्का व्हायरल झाली आहे. गेल्यावेळी 'मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?' आणि 'मुंबई गेली खड्ड्यात' अशी गाणी तयार करत तिने पालिकेवर निशाणा साधला होता. यावेळी तर ती चक्क मुंबईच्या रस्त्यावर उतरली आहे.

या गाण्याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यामध्ये ती लाल साडीमध्ये एका नवविवाहित वधूप्रमाणे तयार झालेली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना 'चांद जमिन पर' म्हणत गाणं तयार केलय. सध्य़ा हे गाणं चांगलच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीदेखील त्याला पसंती दिली आहे. 

फेसबूकच्या माध्यमातून मलिष्काने शेअर केलेल्या या व्हिडिओला काही वेळातच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. अवघ्या काही तासातच तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. आपला देश चंद्रावर पोहोचला. तसाच चंद्र आपल्याकडेदेखील पोहोचला आहे. मुंबईतील खड्डे आणि आपलं सात जन्माचं नात आहे. आता मात्र हे व्रत जपताना ते तोडत असल्याचं तिनं या गाण्यात म्हटलं आहे. एवढचं काय तर खड्ड्यांसोबत हे गाणं शूट करत असताना गाण्यात ती चहाचा आनंद घेतानादेखील दिसत आहे. 

याआधी तिने तयार केलेल्या  'मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का?' या उपहासात्मक गाण्यातून पालिकेवर टिका केली होती. हे गाणं तिनं 2017 मध्ये तयार केलं होतं. दोनवर्षानंतरही या खड्ड्यांची समस्या सुटली नसून परिस्थिती जशास तशी पाहायला मिळतेय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RJ Malishka is Going Viral Yet Again With Another Song