
Rocketry Nambi Effect: कोण आहेत नांबी नारायणन?, का झाला होता देशद्रोहाचा आरोप
Bollywood News: काही दिवसांपासून नांबी नारायण यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. मात्र अनेकांना त्यांच्याविषयी फारशी माहिती नाही. त्यांच्यावर रॉकेट द नांबी इफेक्ट नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्याविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. नंबी यांच्यावर काही वर्षांपूर्वी ते पाकिस्तानसाठी गुप्तहेराचे काम करतात असा आरोपही झाला होता. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होऊनही आपल्या ध्येयापासून जराही न हटणाऱ्या नंबी नारायण यांच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
नंबी नारायण यांचा जन्म केरळ राज्यातील नागरकोईल नावाच्या गावात झाला. त्यांनी कालांतरानं इस्त्रोमध्ये क्रायोजेनिक डिव्हिजन अधिकारी म्हणून काम केलं होतं. आज त्यांना सॅटेलाईटट शास्त्रज्ञ म्हणून ओळखलं जातं. एका मध्यमवर्गीय कुटूंबातून त्यांनी आपली कारकीर्द घडवली. त्यांना लहानपणापासून वाचनाची अतिशय आवड होती. त्यांनी ती शेवटपर्यत जपली. त्यांनी तिरुअनंतपुरम येथील एका महाविद्यालयातून एम टेकपर्यतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आपण देशासाठी काही करावं असा विचार त्यांनी केला.

Rocketry The Nambi Effect
नंबी नारायणन यांनी भारतीय स्पेस एंजन्सीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जाचा विचार करुन नोकरी मिळाली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळे शोध लावत देशाचे नाव उज्जवल केले. मात्र एक वेळ अशी आली होती की, नारायणन् हे पूर्णत खचले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोपही करण्यात आले होते. भ्रष्टाचार आणि गुप्तहेर म्हणून पाकिस्तानसाठी काम करत असल्याचे त्यांच्याबाबत बोलले जाऊ लागले होते. त्यांना अटकही करण्यात आली होती. काही दिवसांनी त्यांना पुन्हा सोडण्यात आले. 1994 सालच्या या घटनेमध्ये नारायणन यांच्यावर दोन अधिकाऱ्यांनी आरोप केले होते. रॉकेट आणि उपग्रह यांच्याशी संबंधित महत्वाची माहिती ते दुसऱ्या देशाला देत असल्याचा संशय त्या अधिकाऱ्यांना होता.
नारायणन यांच्यावर जे काही आरोप झाले ते सीबीआयच्या चौकशीतून बिनबुडाचे असल्याचे दिसुन आले. सीबीआयनं सांगितलं, स्पेस एजन्सीचे काही प्रोगॅम्स डिलिट करण्यासाठी नारायणन यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले होते.